Thursday, 18 September 2008

वडापाव --प्रफ़ुल्ल

BE ची डिग्री हाती पडली पण नोकरी कुठे मिळेना
हजार अर्ज कंपनीला लिहली पण उत्तर काही येइना.

शेवटी जीव माझा वैतागला
काम करण्यास धडपडला
ओलांडून एक नाला
दिसला वडापावाचा ठेला

नोकरी इथ मिळवण्यासाठी अर्ज मी केला.
मुलाखत पुढच्या आठवड्यात आहे
म्हणुन सुटकेचा निश्‍वास टाकला

माझ्यासह आठजण मुलाखतीला आले
प्लेटधुन्यापासुन वडापाव विकण्यापर्यंतचे
सर्व प्रश्‍न त्यांनी मला विचारले
त्या सर्व प्रश्‍नाची मी समाधानकारक उत्तर दिले.

इतर मुलांपेक्षामाझीच उत्तर चांगली ठरली
म्हणुन ’जय मोगँम्बो बाबा वडापाव सेंटर’ मध्ये
नोकरी मला मिळाली.
उपासमारीमुळे नोकरीची सुरुवात दुसर्‍यादिवसापासुनच मी केली

काहीका होइना डिग्री च्या कागदाचा एकच उपयोग झाला
वडापाव च्या गाडीवर फ़्रेम करुन लटकवला.

(आता....... )
भरदुपारी वडापावाची गाडी मी लोटतो
’वडापाव लेलो’ ’वडापाव लेलो’ पण त्याबरोबर
जोरजोराने ओरडतो

वडापावावर मी अवलंबी झालोय
संध्याकाळी शंभरची नोट खिशात घालतोय
आणि पोटाची भुक पण वडापावानेच
शांत करतोय.
वडापावच आता माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक
झालाय
म्हनूनच माझ्या झोपडीच नाव मी ’वडापाव कुटी’
ठेवलय.

सुरुवातीला मला वडापाव विकण्याची लाज वाटत होती
पण काय करणार बेरोजगाराची झळ सर्वांनाच लागली होती
त्यामुळेचतर माझे बरेच वर्गमित्र बाजारात भाजीपाला
विकत होती.

No comments:

Post a Comment