७
आज मला बंडु ईंद्राच्या दरबारात घेउन गेला होता. ईंद्र दरबारातील सर्व देव उपस्थीत होते तसेच सर्व पुंजर्क पण उपस्थीत होते.आम्ही जाण्याआधीच दरबार सुरु झाला होता.आज प्रत्याक्षात देव पहायला भेटले म्हणुन जीवन सफ़ल झाल्यासारखे वाटत होते.देवांचे रुप तर खरच कल्पना करण्यापलीकडॆ होते. त्याचे पोषाख त्याची वेषभूशा सर्वच डोळ्याना तेज देण्यासारखे होती.मी आणि बंडु एका कोपर्यात ऊभे होतो.मी ह्ळुच बंडूला विचारले "काय रे इथ अप्सरा कुठे आहेत ,बरच नाव ऎकल आहे मेनका,रंभा बद्द्ल म्हटल आलोय इतक्या दुर तर जाउ पाहुन,कुठे आहेत कुठे त्या?" बंडु थोड्या तिरक्या नजरेने पाहत आणि मिस्किल हास्य देत म्हणाला "तुम्ही पृथ्वी वरची लोक ना........"ह्या एकाच शब्दात त्याला काय म्हणायचे होते ते मला समजुन गेले.पण मी तर उत्सूकतेमूळे त्याला अप्सराबद्द्ल प्रश्न विचारला होता.मला एका दिशेकडे बोट दाखवुन बंडू चालु लागला.मी पण त्याच्या मागे चालु लागलो.आम्ही दरबाराबाहेर पडलो होतो इथले वातावरणच इथे येणार्याचे वातावरण असल्यामुळे मलाही ईद्रदरबाराचेच वातावरण दिसत होते.हे नाविन्यपुर्ण असलेले सुंदर वातावरण माझ्या मनावर विलक्षण परिणाम करणारे होते.आता आम्ही एका रेशमी पडदा असलेल्या दरवाज्याच्या आत गेलो.अतिशय कलाकुसरीने सजवलेल्या मोठ्मोठ्या मुर्ती आमच्या स्वागतास ऊत्सुक होत्या.मोठ्या भितींवर असलेल्या रंगकामांनी वातावरण आणखी आनंद देत होते.दरक्षणी माझ्या मनात असंख्य प्रश्न पडत होते.पण प्रत्येक प्रश्न बंडुला विचारणे मला शक्य नव्हते.प्रत्येक दिवशी स्वर्गाबद्द्ल प्रश्नाचा सागर मनात असे पण त्यांचे उत्तर मला काही मिळत नसे.त्याच्यातले काही प्रश्न म्हणजे.उलट्या पायाचा सुलटा माणुस इथे स्वर्गात कसा? बंडुला विचारले तर तो म्हणाला त्याची एक जमात इथ स्वर्गात ईद्र देवाकडॆ काही दिवसांसाठी आमंत्रित आहे.आता ही उलट्या पायाच्या सुलट्या माणसांची जमात नर्कातली. आता त्याचे स्वर्गात काय काम?. मेलेले पण स्वर्गात आलेले माणस असता तरी कुठ?आता यावर बंडु म्हणाला होता त्याची ’अग्रस्थ’ अवस्था आहे,म्हणुन आपण त्याच्या वातावरणात जाऊ शकत नाही.आता ही अग्रस्थ अवस्था म्हणजे काय?.पुंजर्का बद्द्ल सुध्दा बरेच प्रश्न होते पण बंडुने कंटाळुन उत्तर द्याचे टाळले होते.कारण पुंजर्काबद्द्ल कुठेच वाचयला मिळाले नव्हते.
आम्ही आता एका भव्य खोलीच्या पायतळाशी आलो होतो.वेगवेगळ्या आकाराची झुंबर वातावरणात तरंगत होती.आणि खाली बघतो तर काय?१०-१२ अप्सरा मोकळ्या जागेत नाचत होत्या.त्याच्या सौदर्याबद्द्ल तर माझ्याकडे शब्दच नाहीत. आता हे गाणं जे सध्या वातावरणात ऎकु येतय आणि ज्यावर ह्या अप्सरा नाचताय ते गाण कुठं तरी ऎकल्यासारख वाटतय आणि मी बंडुला विचारणार तितक्यात मला आठवल अरे हे तर dhoom-2 मधलं krazy kiya re ..... अरे बापरे पृथ्वी वरचे गाणे इथे कसे काय? मी लगेच बंडुला प्रश्न विचारला.
बंडु म्हणाला "लुंगी वर चुंगी बाबानी पृथ्वीवरील काही गाणी गुप्तपणे इथ आणली होती. आणि अप्सरांची मुख्य कार्यकर्ती मेणका यांना ती खुप आवडली म्हणुन त्या गाण्यावर आज अंतिम सराव चालु आहे.उद्या शुक्रवारी सर्व स्वर्गातील मंडळी एकत्र येणार आहे.कारण उद्या किरपांध्रविषेश स्वर्ग बाजार आहे.त्याची ही तयारी सुरु आहे."
मी म्हणालो "किरपांध्रविषेश बाजार?"
"तुला नंतर सांगतो चल पहिले अप्सरा मेणकांना भेटुन घेउ"
आम्ही दालनात पुढे आलो.एक वृध्द स्त्री एका आसनावर बसलेली होती.चेहर्यावर म्हतारपणाच्या सुरकुत्या दाट उमटुन दिसत होत्या.बंडु ने वाकुन नमस्कार केला. आणि मला ही नमस्कार करायला सांगितले.तसा मी नमस्कार केला पण ही म्हतारी स्त्री कोण?आणि स्वर्गात तर कूणी म्हतार होत नाही मग ह्या स्त्री च इतक वय कस?.माझी नजर तर मेणकाला शोधत होती.इतक्यात बंडू म्हणाला "या आहेत अप्सरांच्या मुख्य कार्यकर्त्या मेणकाजी" .मी तर आश्चर्याने त्या मेणका कडे पाहतच राहीलो.ज्या मेणके चे वर्णन करता करता अनेक कवीचे शब्द संपले ती मेणका हीच का? असला प्रश्नच मला पडला. माझ्या त्या आश्चर्यांकित मुद्रेकडे पाहत मेणका म्हणाली.
"पृथ्वी वरुन आलेला तुच तो बालक का?"
बालक!!मला ही म्हतारडी चक्क बालक म्हणतेय.असेल ती स्वर्गाची अप्सरा पण मला बालक म्हण्याचा अर्थ काय?.मला तसा त्या मेणकेचा फ़ार राग येत होता. पण मी काहीच करु शकत नव्हतो.फ़क्त मान हलवत मी तिला होकार दिला.त्यानंतर
पृथ्वी वरचे हालचाल मला मेणकेने विचारले.मीही त्याचे ठिकठाक उत्तर दिले.तस कोणाला माहित आहे पृथ्वीचे काय हाल.आहे जो तो आपआपला स्वार्थ बघतो.पण ती मेणका म्हतारी कशी?
कदाचित बरीच युग गेलीत.त्यात वय झाल असेल ह्या मेणकेच. मी स्वत:चीच समजुत काढत होतो.आम्ही मेणकेची भेट घेऊन पुन्हा परत येऊ लागलो.मनात तोच प्रश्न पुन्हा?शेवटी मी बंडुला प्रश्न विचारलाच.बंडु त्यावर म्हणाला "आजच्या २५ वर्षापहिले मेणकेने अखिल स्वर्गीय नृत्य संमेलनात काही कारणामुळे एका महान अशा साधुबाबाचा अपमान केला.त्यानीच मेणकेला म्हतारपणाचा शाप दिला."
"पण कुठवर हा शाप असाच रहिल त्याचा काही उशाप पण असेल ना?"
"हो आहे ना!!!! पण एकदम अशक्य वाटणारा"
"कोणता?"
"पृथ्वी वरच्या १०० पुण्यवान माणसांनी येऊन स्वच्छ आणि पवित्र गंगेच पाणी छिडकल्यावर मेणका शाप मुक्त होइल असा उशाप आहे"
"मग फ़ार कठिण आहे.कदाचित अशक्यही.कारण पृथ्वीवर पुण्यवान माणस शोधण्याचा प्रयत्न करण्याचा विचारही कोणी करु शकत नाही .आणि गंगेच स्वच्छ , पवित्र पाणी मिळवण्याचा प्रयत्न करण म्हणजे केवळ मुर्खपणा आहे"
या माझ्या वक्तव्यावर बंडु फ़क्त मेणकॆकडे उदास होऊन बघत होता.मग आम्ही पुन्हा दरबाराकडे जाण्यास निघालो.
क्रमश:
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment