Tuesday 10 March, 2009

माझी स्वर्गाची यात्रा (भाग-५)


       किरपांध्रविषेश बाजार म्हणजे या बाजारात सर्व देवगण आणि सर्व अग्रस्थ अवस्थेतील मानव,पुंजर्क या दिवशी एकत्र एका वातावरणात येतात.हा बाजार फ़क्त काही महत्वाचे निर्णय घेवयाचे असतील त्याच वेळेस भरतो.बाजार संपण्याच्या वेळेस दरबारात काही महत्वाचे ठराव पास होतात.मागच्या वेळेस पुंजर्काना स्वर्गाच्या देखरेख विभागात दाखल करण्यात आले होते.आणि स्वर्ग आणि नर्क कामगार संघटना (Associations of workers of swarg and nark) स्थापण करण्यात आली होती.बर्‍याच दिवसापासुन मला पुंजर्का बद्द्ल प्रश्न पडला होता.पण त्याचा अर्थ आज या ’स्वर्ग-नर्क इतिहास’ या पुस्तकात माहित पडला.पुंजर्काचे वंशज हे पुराणातील दानव आहेत हे मला यातून कळाले.म्हणुनच तर बंडु मला पुंजर्का बद्द्ल माहिती सांगण्यास कचरत होता.  
          दानव आणि देव यातील शेवटच्या युध्दात देवांचा विजय झाला.त्यात दानवाचा पराभव झाला.सर्व दानवांना मारण्यात आले.कारण हे दानव भंयकर,क्रुर होते.पण त्यातले काही योध्ये दानव म्रृत्युलोकात पळून गेले.पण मारल्या गेलेल्या काही दानवाचीच लहान मुल होती.काही तर नवजात शिशु होती.हि बालक निष्पाप होती म्हनून त्यांना जिवनदान देण्यात आले.निष्पापच्या कारणामुळे त्याना स्वर्गात जागा मिळाली.आणि पुढे जावुन त्यांना पुंजर्क म्हणुन संबोधन मिळाले.या युध्दात फ़क्त काहीच देव सहभागी होते.कारण कलयुग सुरु होताच जवळ जवळ सर्वच देवता समाधीत गेली.दर कलयुगात फ़क्त काही कोटी देवता समाधीत जातात पण या कलयुगात इतके देव समाधीत का गेलीत?.याच कारण मात्र मला समजु शकल नाही.या सर्व गोष्टीमुळे मी अवाकच झालो होतो.
 शेवटच्या युध्दात मारल्या गेलेल्या दानवांना नर्कात जागा दिली गेली.कृत्रीम शरीर देवुन त्याना अग्रस्थ अवस्थेत टाकले गेले.त्याचे पाप इतके होते की त्यादिवसापासुन आज पर्यत त्यांना नर्क यातना दिल्या जात आहे.अग्रस्थ अवस्था काय असते याच्या बद्द्ल मला फ़ुंकणीरावानी थोडेफ़ार मला सांगीतले होते पण त्यावेळेस मला इतके विषेश वाटले नव्हते.माणुस मरतो तेव्हा त्याच्या कर्मानी स्वर्ग किंवा नर्क गाठतो पण तो मेल्यावर त्याचे शरिर मेल्यावर. फ़क्त त्याचा आत्माच या स्वर्गात किंवा नर्कात प्रवेश करतो. स्वर्ग म्हणजे सुखाची जागा आणि नर्क म्हणजे दु:ख. स्वर्ग म्हणजे वाटेल त्या सुखसुविधा आणि नर्क म्हणजे दिर्घकाळ यातना.पण आत्म्याला कसले आले सुख आणि दु:ख .त्याला कितीही यातना दिल्या किंवा सुख सुविधा दिल्या तरी आत्म्याला काय फ़रक पडणार म्हनून यावर तोडगा ब्रह्मदेवांनी शोधला.की त्यांना द्‍वारापाशीच कृत्रीम शरिर देण्यात यावे.सर्व मृतांना स्वर्ग-नर्कावर आल्यावर शरिर दिले जाते.आणि त्याच्या कर्मानुसार त्यांना फ़ळ दिले जाते.आणि विषेश म्हणजे त्याना मागच्या जन्माचे काहीच आठवत नाही. पण ही तर फ़क्त अग्रस्थ अवस्था का टाकले जाते.याचे स्पष्टीकरण होते.पण अग्रस्थ अवस्था नेमकी काय असते ते मला काही माहीत नव्हते.ते कदाचित आज किरपांध्रविषेश बाजारात अग्रस्थ अवस्थे बद्द्ल माहित पडण्याची शक्यता होती.कारण आज अग्रस्थ अवस्थेतील मानव बाजारात येणार होती.
 
    ओम चलाकिरपांध्रविषेशबाजार नम:. क्षणार्धात मी बाजाराच्या वातावरणात आलो.आता या वेगवेगळ्या वातावरण पहाण्याची मला सवय झाली होती. पण या बाजारात काही विकायला किंवा विकत घ्यायला दिसत नव्हते.नाहीतर बाजार म्हटल तर असलेच चित्र डोळ्यासमोर उभे रहाते पण हे चित्र भरपुर वेगळे होते.


क्रमश: