Monday 1 September, 2008

माझी स्वर्गाची यात्रा --प्रफ़ुल्ल (भाग -२)

.
जाग आली तेव्हा मी एका भव्य राजमहालात होतो. रंगीबेरंगी असलेल्या बिछान्यावर पहुडलो होतो. सुगंधी अत्तराचा वास येत होता.राजमहल सुंदर पणे सजवलेले होते अस वाटत होत की आपण जुन्या काळाच्या राजवाड्यात तर नाही ना आलो.उठुन लगेच मी दरा बाहेर डोकावले ,बघतो तर काय सर्वीकडे भव्य इमारती होत्या.वेगवेगळ्या प्रकारच्या आणि आकाराच्या झाडांनी त्या इमारती आणखीनच खुलुन दिसत होत्या.आकाश निळेच होते .ते वेगवेगळ्याप्रकारच्या वस्तुनी सजले होते त्या वस्तु काय होत्या त्याची नाव मला माहीत नाही त्या आकाशात अधांतरी लटकलेल्या होत्या पण त्यांनीच आकाशाला खुपच सुंदर बनवले होते .जितके वर्णन करावे तितके कमीच होइल.पण ह्या सर्व गोष्टी मुळे माझे डोळे दिपुन गेले होते. खर तर माझ्या डोळ्यावर माझा विश्‍वास बसत नव्हता.मग खात्री पटली की खरच हे स्वर्ग आहे..इतक्यात बाहेरच्या आकाशात इंद्रधनुष्य तयार झाले अरे बापरे हे तर जवळ-जवळ ४० ते ५० रंगाचे होते.काही रंग तर मी अजुन पर्यंत पाहीले नव्हते.त्यातले ४-५ रंग पृथ्वीवर अस्तीत्वातच नव्हते.मला तर newton च्या prism therom ची आठवण आली.त्याने पाहिले असते तर चक्कर येऊन खाली पडला असता किंवा बहुतेक वर पडला असता. नाही खालीच पडला असता, समोरच्या आंब्याच्या झाडाखाली सफ़रचंद पडले तेव्हा मी माझे मत पक्के केले.बर झाल निदान GRAVITY चा नियम तरी स्वर्ग ने मोडलेला नाही. नाही तर new-ton च काय झाल असत?.पण आब्यांच्या झाडाला सफ़रचंद कसे?सर्व विज्ञानाच्या नियमाची धुळाधुळ उडवाणार्‍या त्या वातावरणाकडे मी एकटक पणे पाहत होतो.
पण मला तर कृत्रीम शरीर मिळणार होते पण माझ्यातर काहीच बदल झालेला नव्हता ?किती वेळ मी बेशुध्द होतो?आपले त्यानंतर काय झाले?नेमक त्या मशिन मधुन आपण कसे काय इथे पहोचलो असे एक ना अनेक प्रश्‍न मला पडु लागली कोणाला विचारावे तर आजुबाजुला कोणीच दिसत नव्हत.इतक्यात मागुन आवाज आला.
"अहो ... महाशय .."
मी मागे वळुन पाहीले.राजवस्त्र आणि सोन्याचे अलंकार घातलेला एक मनुष्य माझ्या पाठीमागे उभा होता.लागलीच त्याने वाकुन नमस्कार केला मला वाटल की इथला हा रीतीरिवाज असेल म्हनुन मी ही त्याला वाकुन नमस्कार केला. मी त्याला विचारले."आपण....".
"मी फ़ूंकणीराव गंजलेले तुम्ही आमचे पाहुणे मला लुंगी बाबानी आपल्या बद्‍दल सांगीतले आहे.".मला असंख्य प्रश्‍न पडलेले होते.त्याने मन येडेपिसे झाले होते.मला राहवले गेले नाही त्याना सरळ विचारले
" मी तर एका मशिन मध्ये गेलो त्यानंतरच मला काहीच आठवत नाही.मला तर कृत्रीम शरीर मिळणार होते पण माझ्यात तर काहीच बदल दिसत नाही"
"हो सर्व बरोबर आहे. त्या मशिन मध्ये गेल्यानंतर,काही मंत्रानी तुमचे मन,ऋदय,आणि मन बाजुला केले गेले आणि ’स्वर्गलीगी’ मंत्रामध्ये या अवयवांच्या वजनाचा उच्चार झाला आणि ते मशिन सुरु झाले तुमचे तिथले शरीर बाजुला टाकले गेले आणि स्वर्गाच्या द्वारापाशी येताच तुम्हाला कृत्रीम शरीर दिले गेले.ते हुबेहु तुमच्या तिथल्या शरिरासारखेच. तिथुन मी तुम्हाला या राजमहालात आणले. ".
"पण इथ शरिरवाटपची काय गरज ?सरळ आले तर नाही का चालणार?"
"बघा माणुस मरतो तेव्हा त्याच्या कर्मानी स्वर्ग किंवा नर्क गाठतो पण तो मेल्यावर त्याचे शरिर मेल्यावर. फ़क्त त्याचा आत्माच या स्वर्गात किंवा नर्कात प्रवेश करतो. स्वर्ग म्हणजे सुखाची जागा आणि नर्क म्हणजे दु:ख. स्वर्ग म्हणजे वाटेल त्या सुखसुविधा आणि नर्क म्हणजे दिर्घकाळ यातना.पण मला सांगा आत्म्याला कसले आले सुख आणि दु:ख .त्याला कितीही यातना दिल्या किंवा सुख सुविधा दिल्या तरी आत्म्याला काय फ़रक पडणार म्हनून यावर तोडगा ब्रह्मदेवांनी शोधला. की त्यांना द्‍वारापाशीच कृत्रीम शरिर देण्यात यावे.सर्व मृतांना इथ आल्यावर शरिर दिले जाते त्याना मागच्या जन्माचे काहीच आठवत नाही.पण तुम्हाला जीवंत आणायाचे म्हणुन तुमचे महत्त्वाची अवयव इथ आणली गेली आणि कृत्रीम शरीर दिले गेले."त्याच्या या स्पष्टीकरणांने माझे काही प्रश्‍न सुटली पण बरीच प्रश्‍न जसे च्या तशीच होती.
"बाहेरील थक्क करणार्‍या गोष्टीनी मला बुचकाळ्यात पाडले आहे."
"तुम्हाला आणखीन भरपुर गोष्टी माहीत व्हायच्या आहेत . तुम्ही जे बघता आहेत ते वातावरण प्रत्येकाला सुरुवातीला निर्माण करुन दिले जाते नंतर ते स्वत: विकसीत करायचे असते तुम्ही जे वातावरण बघता आहेत ते वेगळे आहे आणि मी बघतोय ते वेगळे आहे मला तर आजुबाजुला मोठमोठाले हिमालाय दिसताय संथ वाहणारी नदी समोर दिसते आहे"तो बोट समोर दाखवुन बोलत होता मी पाहीले तर समोर सपाट जमीनीवर उगवलेले वृक्षच दिसत होते.

क्रमश:

No comments:

Post a Comment