Monday, 8 September 2008

वाघाची वाट --प्रफ़ुल्ल

वाघ मोजण्याची जबाबदारी एकदा माझ्यावर पडली
हे काम करण्यास ’वाटबघावाट’ जंगलाची वाट मी धरली.

रानोरान तुडवू लागलो चार दिवस शोधुन थकलो.
मनात वाटले फ़िरुन जावे वाघाची संख्या झिरो आहे.

तितक्यात एक डरकाळी वाघाची आली.
फ़िरवुन पाठ त्या दिशावर वाटचाल मी केली.

दिसले दृश्य अद्‍भुत होते एक वाघ
दोरीच्या फ़ासाजवळ उभा होता
अरे बापरे तो तर आत्महत्या करण्यास तयार होता.

वाघा वाघा थांब जरा प्राण नको देऊ
वाट्टेल ती मदत करतो पण फ़ाशी नको घेऊ

डोळे त्याचे फ़िरले मला पाहुन चमकले
दोन पाऊल पुढे आला आणि
मला गर्जून म्हणाला.

"तुम्ही मानवाने माझे दोन बंधू मारले.
तीन मामाना पिंजर्‍यात डांबले.
दोन काका शहर पहायला गेले ते
कायमचेच गेले.
बाकी दोन भाऊ ते सर्कशीत नाचण्यास नेली.
या जंगलात फ़क्‍त माझीच चिता रचायची राहीली
म्हनून माझ्या मनाची ठिंणगी पेटली.
ह्यामुळे मी प्रतिज्ञा घेतली की,

या जंगलात मी एका माणसाचा अंत करेल.
तरच पुढच जीवन जगेल

आठ दिवसापासुन एक माणुस इथ नाही फ़िरकला
माझ्याकडे पाहुन तो बोलला बर झाल तु आला.
माझ्या आत्महत्येचा प्रसंग टळला"

हे ऎकुन भान माझे हरपले
दिवसाढवळ्या तारे डोळ्यासमोर चमकले.
त्याने झेप घेण्यापहिले मीच माझे शब्द फ़ेकले.

वाघा तु येडावतोय नऊ जणांचा बदला
तु एकावर निभावतोय
माझ ऎक एक दिवस बघ वाट
तुझ्या बदल्यासाठी आणखी माणसं आणतो आठ

या मतावर मान हलवून संमती त्याने दिली
पटक्यात तिथून परतीची वाट मी धरली

मग वाघ बघत राहीला माझी वाट
वाट बघता बघताच लागली वाघाची ’वाट’

तिसर्‍या दिवशी बातमी पेपरात छापली
’वाटबघावाट’ जंगलाची वाघ संख्या झिरो झाली.

2 comments:

  1. Mastch kavita ahe pappu dada, mala tar kalpana avadali & ha changala jwalant vishaypan ahe. vinod ani fact yanchi uttam sangad ghatali ahe. I like it.

    ReplyDelete
  2. वा !!
    मस्त कविता आहे.
    पण अभ्यास नाहि केला तर degree चि "वाटबघावाट". ;)

    ReplyDelete