Monday 15 September, 2008

माझी स्वर्गाची यात्रा (भाग -३) --प्रफ़ुल्ल

इथला सर्व कारभार मंत्रानीच चालतो. म्हणजे जेवन पाहीजे असेल तर पदार्थाच नाव मंत्रात उच्चारायच पदार्थ लगेच हजर.मग मी मंत्र म्हणन्याचा प्रयत्‍न केला. मी ’ओम गुलाबजामुन नम: म्हणालो तर एक गुलाबजामुन जमीनीवर हजर झाला.मग फ़ुंकणीरावांनी सांगीतले की किती पाहीजे व कशात पाहीजे ते पण त्यात उच्चारयचे.मग मी मंत्र सुधरवून म्हणालो ’ओम गुलाबजामुन५० पातेलीत नम: ’ तेव्हा कुठे ते गुलाबजामुन पातेलीत आले.गुलाबजामुन बरोबर मनसोक्‍त वेगवेगवेळे पदार्थ खाल्ले.मग काय नुसती मज्जा.फ़ुंकणीरावांनी मला थोड्याथोड्या गोष्टी सांगीतल्या.त्यामुळे थोडेफ़ार मंत्र मला तयार करता येत होते .आणि बाकीची माहीती तुला बंडु सांगेल. अस ते म्हणाले होते.बंडु हा त्याचा मावस भाऊ होता.आणि २० तासांनंतर भॆटणार होता.इथ सुर्य चंद्र वैगरे आपल्याला हवे तसे आपल्या वातावरणात फ़िरवता येतात.कारण सभोतालचे वातावरण आपणच निर्माण केलेले होते.आता थोड झोपुन घ्याव अस वाटल मग घेतला मंत्र ’ओम रात्रीहो नम:’ क्षणार्धात काळोख झाला.आणि मी झोपी गेलो.
६.
किती वेळ झोपलो होतो माहीत नाही.वेळेचे भान रहावे म्हनून एक घड्याळ सकाळ करण्यापहीले हातात घातले.मग त्यानंतर सकाळच्या वातावरणात चहा पित होतो.समोर T.V आणला पण स्वर्गात ’संस्कार १’ आणि ’आस्था ५’ या channel शिवाय कोणतेच channel लागत नव्हते मग काय़ T.V बंद करुन दिला.मग बाहेरची वातावरणनिर्मीती करु लागलो.असंख्य कलप्ना सागरात मी बुडुन गेलो होतो. आणि त्या मी अस्तित्वात आणत होतो.इतक्यात कोणीतरी क्षणात डोळ्यासमोर दॄष्य झाले.
मी त्याला काहीतरी विचारणार त्या पहीलेच तो म्हणालो.
"मी बंडु मला फ़ुंकणीरावांनी पाठवले आहे "
"हो त्यांनी मला तुमच्या बद्‍द्ल सांगीतले होते"
मग हळुहळु आमची ओळख वाढु लागली. आम्ही एकाच वयाचे होतो त्यामुळे मोकळेपणाने गप्पा आम्ही मारु लागलो.त्याने मला विचारले.
"तुझे शिक्षण काय झाले"
" BE COMPUTER झालोय"मी मोठ्या अभिमानाने सांगितले. पण त्यावर बंडू जोरजोराने हसु लागला आणि हसता हसता म्हणाला
" काssssय BE ssss ...तुझssss वय 21 आणि तु फ़क्त BE केलीय ssssss"त्याच हसण्याचा आणि मला असं बोलण्याचा फ़ार राग आला. अस वाटल याच्या दोन गालात द्याव. याला काय माहीत BE व्हायला किती आटापिटा करावा लागतो जिवाचे काय हाल होतात.पण मला तस काही करता नाही आलं.काय करणार तो होतो पुंजर्क म्हणजे देवा नंतर पुंजर्कानाच तिथे मान होता.स्वर्गात फ़क्त पुंजर्क आणि देवच जिवंत होते आणि आता मी.
मी त्याला तोच प्रश्‍न विचारला "आणि तुझ शिक्षण काय झालय",
"मी BKABFZ झालोय "
"काय?"
"म्हणजे बस कर आता ब्रेन फ़ुल झाला."
"ही कोणत्या प्रकारच शिक्षण आहे ?"मला वाटल हा माझी चेष्टाच करतोय.
"इथ आम्हा पुंजर्काना जन्मापासुन शिक्षण दिले जाते.BE ची पदवी आम्ही वयाच्या पहिल्या वर्षीच घेतली होती त्यात सर्व शाखाची पदवी आली.नंतर दुसर्‍या वर्षी वैदकीय शिक्षण घेतले होते त्यानंतर वयाच्या १५ व्या वर्षापर्यंत मी पदव्याच घेत होतो पण नंतर मेंदु मध्ये साठवण्यासाठी जागाच शिल्लक नव्हती मग मला ईद्र देवांनी BKABFZ ची पदवी दिली.मी मेंदु ची जागा वाढवण्यासाठी ब्रम्हदेवांना अर्ज केलाय त्यांचे उत्तर अजुन आल नाहीय पण १-२ वर्षात येईल" त्याचे हे बोलणे ऎकुन आता मलाच माझी लाज वाटु लागली.म्हणुन मी ह्यानंतरचा विषय टाळला.
काही वेळापुर्वी पुस्तक वाचण्याची इच्छा मला झाली होती,ती मी त्याला सांगितली "बंडू मला काही पुस्तक वाचायला मिळ्तील का?,काही वेळापुर्वी मी पुस्तक आणण्याचा प्रयत्‍न केला होता पण तो पुरता फ़सला.मी म्हणालो ओम छावा नम: तर वाघाच पिल्लु समोर आल माझ्यावर झेप घेणार होता पण तितक्यात त्याला गायब केल मरता मरता वाचलो."
बंडू माझे बोलणे एकुन हसू लागला.मला त्याच्या हसण्याचा तसा थोडा राग आला. पण त्याच्या बोलण्यानंतर मी पण माझ्या बोलण्यावर हसलोच. तो म्हणाला होता."स्वर्गात मरण्याला घाबरणारा तु पहिलाच... ". स्वर्गात मेल्यावर स्वर्गातच जागा मिळते हे मी विसरुनच गेलो होतो.
पण माझा पुस्तकाचा प्रश्‍न तसाच राहीला होता मी बंडूला आठवण करुन दिली.त्यावर बंडु म्हणाला.
"पुस्तक वाचण्याच्या दोन पद्‍धती आहेत.प्रत्यक्ष वाचन आणि अप्रत्यक्ष वाचन"
"प्रत्यक्ष ,अप्रत्यक्ष वाचन ???"
"प्रत्यक्ष वाचन म्हणजे तुम्ही पृथ्वी वरचे लोक पुस्तक वाचता तसे आणि दुसरे म्हणजे अप्रत्यक्ष वाचन त्यात ’डोक्यातघाल’ नावाच्या मशिनी मध्ये डोके घालायचे आणि पुस्तकाचे नाव मंत्रात घ्यायचे २ सेंकदात पुर्ण पुस्तक वाचले जाते."
असं होय तर!!!! म्हणुन हा bkabfz पदवी वर इतक्या उड्या मारत होता.तेच म्हटल BE च्या एका शाखेचं शिक्षण घेण्यासाठी चांगल्याचांगल्याची वाट लागते तिथ हा वयाच्या पहिल्याच वर्षी सर्व BE च्या शाखेतील पदवी मिळवतो.
रोज काहीनाकाही गोष्टी माहीत पडत होत्या, हजारो प्रश्‍न पडत,मन संभ्रमीत होत असत. हे जग तर मायावीच होत.प्रत्येक दिवशी काहीतरी अद्‍भुत आणि विचीत्र गोष्टी माहीत पडत होत्या अजुन स्वर्गाची संकल्पना थोडीशी सुद्धा माहित झाली नव्हती. स्वर्गाचा आणखी बराच प्रवास बाकी होता.

No comments:

Post a Comment