Wednesday, 3 November 2010

एक पाखरू मला दिसते.

एक पाखरू मला दिसते.
पाहून मला हुळूच हसते
जेव्हा काही बोलायचे असते
पाठ फिरून का बर फिरते


या गोष्टीवर विचार करतो
पुन्हा पुन्हा मी गर गर करतो
यावर मन माझे लिहित जाते
कागदावर शब्द उमटत जाते
एक पाखरू मला दिसते.



प्रेम पत्र मी तिला दिले
वाच म्हणून हे सांगतले
हुळूच तिने पत्र उघडले
नयन तिचे ते पाहू लागले
पाहून पत्र का ती हसते
त्यावर ती काय म्हणते
एक पाखरू मला दिसते.



ती म्हणाली :
“मुझे मराठी समज नही आती
क्या लिखा ये पढ नही पाती
में मराठी बोलणे से डरती हु
एसिलये तुझे देख के में भागाती हु
गलत न समज ये मेरे दोस्त
सिर्फ हिंदी हि में समजती हु "

त्यानंतर मी हिंदी शिकत राहिलो
कठोर परिश्रम घेत राहिलो
आणि मी हिंदी पंडित झालो
आता पत्र मन तिला लिहिते
एक पाखरू मला दिसते.


एक दिवस तिचे उत्तर आले
“क्या बकवास तू हिंदी लिखता हे
क्या बकवास तू हिंदी बोलता हे
न कर बोर ये दिल केहता हे

मेरे शादी का ये कार्ड हे
आना चाहता हे तो 
 चुपचाप बैठके आना हे”


हे सारे  आमच्या आयुष्यात घडते
असे झाले म्हणून खाचायचे नसते
खंबीर मानाने उभे राहायचे असते
आणि पाखरू दुसरे शोधायचे असते

Monday, 4 October 2010

मराठी चित्रपटाची वाट

नुसते मराठी चित्रपटाचे दर कमी करून  मराठी  चित्र  पुढे  धावणार  नाही .मराठी पाऊल जर पुढे टाकायचे असेल तर  त्यासाठी  प्रथमता  मराठी  चित्रपटाना तितके मजबूत  व्हावे  लागेल. आजच्या  market मध्ये  टिकण्यासाठी  ते  गरजेचे  आहे . नाहीतर कोणताही प्रेक्षक चित्रपट  पाहण्यास धजावणार नाही.

Tuesday, 10 March 2009

माझी स्वर्गाची यात्रा (भाग-५)


       किरपांध्रविषेश बाजार म्हणजे या बाजारात सर्व देवगण आणि सर्व अग्रस्थ अवस्थेतील मानव,पुंजर्क या दिवशी एकत्र एका वातावरणात येतात.हा बाजार फ़क्त काही महत्वाचे निर्णय घेवयाचे असतील त्याच वेळेस भरतो.बाजार संपण्याच्या वेळेस दरबारात काही महत्वाचे ठराव पास होतात.मागच्या वेळेस पुंजर्काना स्वर्गाच्या देखरेख विभागात दाखल करण्यात आले होते.आणि स्वर्ग आणि नर्क कामगार संघटना (Associations of workers of swarg and nark) स्थापण करण्यात आली होती.बर्‍याच दिवसापासुन मला पुंजर्का बद्द्ल प्रश्न पडला होता.पण त्याचा अर्थ आज या ’स्वर्ग-नर्क इतिहास’ या पुस्तकात माहित पडला.पुंजर्काचे वंशज हे पुराणातील दानव आहेत हे मला यातून कळाले.म्हणुनच तर बंडु मला पुंजर्का बद्द्ल माहिती सांगण्यास कचरत होता.  
          दानव आणि देव यातील शेवटच्या युध्दात देवांचा विजय झाला.त्यात दानवाचा पराभव झाला.सर्व दानवांना मारण्यात आले.कारण हे दानव भंयकर,क्रुर होते.पण त्यातले काही योध्ये दानव म्रृत्युलोकात पळून गेले.पण मारल्या गेलेल्या काही दानवाचीच लहान मुल होती.काही तर नवजात शिशु होती.हि बालक निष्पाप होती म्हनून त्यांना जिवनदान देण्यात आले.निष्पापच्या कारणामुळे त्याना स्वर्गात जागा मिळाली.आणि पुढे जावुन त्यांना पुंजर्क म्हणुन संबोधन मिळाले.या युध्दात फ़क्त काहीच देव सहभागी होते.कारण कलयुग सुरु होताच जवळ जवळ सर्वच देवता समाधीत गेली.दर कलयुगात फ़क्त काही कोटी देवता समाधीत जातात पण या कलयुगात इतके देव समाधीत का गेलीत?.याच कारण मात्र मला समजु शकल नाही.या सर्व गोष्टीमुळे मी अवाकच झालो होतो.
 शेवटच्या युध्दात मारल्या गेलेल्या दानवांना नर्कात जागा दिली गेली.कृत्रीम शरीर देवुन त्याना अग्रस्थ अवस्थेत टाकले गेले.त्याचे पाप इतके होते की त्यादिवसापासुन आज पर्यत त्यांना नर्क यातना दिल्या जात आहे.अग्रस्थ अवस्था काय असते याच्या बद्द्ल मला फ़ुंकणीरावानी थोडेफ़ार मला सांगीतले होते पण त्यावेळेस मला इतके विषेश वाटले नव्हते.माणुस मरतो तेव्हा त्याच्या कर्मानी स्वर्ग किंवा नर्क गाठतो पण तो मेल्यावर त्याचे शरिर मेल्यावर. फ़क्त त्याचा आत्माच या स्वर्गात किंवा नर्कात प्रवेश करतो. स्वर्ग म्हणजे सुखाची जागा आणि नर्क म्हणजे दु:ख. स्वर्ग म्हणजे वाटेल त्या सुखसुविधा आणि नर्क म्हणजे दिर्घकाळ यातना.पण आत्म्याला कसले आले सुख आणि दु:ख .त्याला कितीही यातना दिल्या किंवा सुख सुविधा दिल्या तरी आत्म्याला काय फ़रक पडणार म्हनून यावर तोडगा ब्रह्मदेवांनी शोधला.की त्यांना द्‍वारापाशीच कृत्रीम शरिर देण्यात यावे.सर्व मृतांना स्वर्ग-नर्कावर आल्यावर शरिर दिले जाते.आणि त्याच्या कर्मानुसार त्यांना फ़ळ दिले जाते.आणि विषेश म्हणजे त्याना मागच्या जन्माचे काहीच आठवत नाही. पण ही तर फ़क्त अग्रस्थ अवस्था का टाकले जाते.याचे स्पष्टीकरण होते.पण अग्रस्थ अवस्था नेमकी काय असते ते मला काही माहीत नव्हते.ते कदाचित आज किरपांध्रविषेश बाजारात अग्रस्थ अवस्थे बद्द्ल माहित पडण्याची शक्यता होती.कारण आज अग्रस्थ अवस्थेतील मानव बाजारात येणार होती.
 
    ओम चलाकिरपांध्रविषेशबाजार नम:. क्षणार्धात मी बाजाराच्या वातावरणात आलो.आता या वेगवेगळ्या वातावरण पहाण्याची मला सवय झाली होती. पण या बाजारात काही विकायला किंवा विकत घ्यायला दिसत नव्हते.नाहीतर बाजार म्हटल तर असलेच चित्र डोळ्यासमोर उभे रहाते पण हे चित्र भरपुर वेगळे होते.


क्रमश:






Wednesday, 25 February 2009

माझी स्वर्गाची यात्रा (भाग ४) --प्रफ़ुल्ल पाटील

७
आज मला बंडु ईंद्राच्या दरबारात घेउन गेला होता. ईंद्र दरबारातील सर्व देव उपस्थीत होते तसेच सर्व पुंजर्क पण उपस्थीत होते.आम्ही जाण्याआधीच दरबार सुरु झाला होता.आज प्रत्याक्षात देव पहायला भेटले म्हणुन जीवन सफ़ल झाल्यासारखे वाटत होते.देवांचे रुप तर खरच कल्पना करण्यापलीकडॆ होते. त्याचे पोषाख त्याची वेषभूशा सर्वच डोळ्याना तेज देण्यासारखे होती.मी आणि बंडु एका कोपर्‍यात ऊभे होतो.मी ह्ळुच बंडूला विचारले "काय रे इथ अप्सरा कुठे आहेत ,बरच नाव ऎकल आहे मेनका,रंभा बद्‍द्ल म्हटल आलोय इतक्या दुर तर जाउ पाहुन,कुठे आहेत कुठे त्या?" बंडु थोड्या तिरक्या नजरेने पाहत आणि मिस्किल हास्य देत म्हणाला "तुम्ही पृथ्वी वरची लोक ना........"ह्या एकाच शब्दात त्याला काय म्हणायचे होते ते मला समजुन गेले.पण मी तर उत्सूकतेमूळे त्याला अप्सराबद्‍द्ल प्रश्न विचारला होता.मला एका दिशेकडे बोट दाखवुन बंडू चालु लागला.मी पण त्याच्या मागे चालु लागलो.आम्ही दरबाराबाहेर पडलो होतो इथले वातावरणच इथे येणार्‍याचे वातावरण असल्यामुळे मलाही ईद्रदरबाराचेच वातावरण दिसत होते.हे नाविन्यपुर्ण असलेले सुंदर वातावरण माझ्या मनावर विलक्षण परिणाम करणारे होते.आता आम्ही एका रेशमी पडदा असलेल्या दरवाज्याच्या आत गेलो.अतिशय कलाकुसरीने सजवलेल्या मोठ्मोठ्या मुर्ती आमच्या स्वागतास ऊत्सुक होत्या.मोठ्या भितींवर असलेल्या रंगकामांनी वातावरण आणखी आनंद देत होते.दरक्षणी माझ्या मनात असंख्य प्रश्न पडत होते.पण प्रत्येक प्रश्न बंडुला विचारणे मला शक्य नव्हते.प्रत्येक दिवशी स्वर्गाबद्द्ल प्रश्नाचा सागर मनात असे पण त्यांचे उत्तर मला काही मिळत नसे.त्याच्यातले काही प्रश्न म्हणजे.उलट्या पायाचा सुलटा माणुस इथे स्वर्गात कसा? बंडुला विचारले तर तो म्हणाला त्याची एक जमात इथ स्वर्गात ईद्र देवाकडॆ काही दिवसांसाठी आमंत्रित आहे.आता ही उलट्या पायाच्या सुलट्या माणसांची जमात नर्कातली. आता त्याचे स्वर्गात काय काम?. मेलेले पण स्वर्गात आलेले माणस असता तरी कुठ?आता यावर बंडु म्हणाला होता त्याची ’अग्रस्थ’ अवस्था आहे,म्हणुन आपण त्याच्या वातावरणात जाऊ शकत नाही.आता ही अग्रस्थ अवस्था म्हणजे काय?.पुंजर्का बद्‍द्ल सुध्दा बरेच प्रश्न होते पण बंडुने कंटाळुन उत्तर द्याचे टाळले होते.कारण पुंजर्काबद्द्ल कुठेच वाचयला मिळाले नव्हते.
आम्ही आता एका भव्य खोलीच्या पायतळाशी आलो होतो.वेगवेगळ्या आकाराची झुंबर वातावरणात तरंगत होती.आणि खाली बघतो तर काय?१०-१२ अप्सरा मोकळ्या जागेत नाचत होत्या.त्याच्या सौदर्याबद्‍द्ल तर माझ्याकडे शब्दच नाहीत. आता हे गाणं जे सध्या वातावरणात ऎकु येतय आणि ज्यावर ह्या अप्सरा नाचताय ते गाण कुठं तरी ऎकल्यासारख वाटतय आणि मी बंडुला विचारणार तितक्यात मला आठवल अरे हे तर dhoom-2 मधलं krazy kiya re ..... अरे बापरे पृथ्वी वरचे गाणे इथे कसे काय? मी लगेच बंडुला प्रश्न विचारला.
बंडु म्हणाला "लुंगी वर चुंगी बाबानी पृथ्वीवरील काही गाणी गुप्तपणे इथ आणली होती. आणि अप्सरांची मुख्य कार्यकर्ती मेणका यांना ती खुप आवडली म्हणुन त्या गाण्यावर आज अंतिम सराव चालु आहे.उद्या शुक्रवारी सर्व स्वर्गातील मंडळी एकत्र येणार आहे.कारण उद्या किरपांध्रविषेश स्वर्ग बाजार आहे.त्याची ही तयारी सुरु आहे."
मी म्हणालो "किरपांध्रविषेश बाजार?"
"तुला नंतर सांगतो चल पहिले अप्सरा मेणकांना भेटुन घेउ"
आम्ही दालनात पुढे आलो.एक वृध्द स्त्री एका आसनावर बसलेली होती.चेहर्‍यावर म्हतारपणाच्या सुरकुत्या दाट उमटुन दिसत होत्या.बंडु ने वाकुन नमस्कार केला. आणि मला ही नमस्कार करायला सांगितले.तसा मी नमस्कार केला पण ही म्हतारी स्त्री कोण?आणि स्वर्गात तर कूणी म्हतार होत नाही मग ह्या स्त्री च इतक वय कस?.माझी नजर तर मेणकाला शोधत होती.इतक्यात बंडू म्हणाला "या आहेत अप्सरांच्या मुख्य कार्यकर्त्या मेणकाजी" .मी तर आश्‍चर्याने त्या मेणका कडे पाहतच राहीलो.ज्या मेणके चे वर्णन करता करता अनेक कवीचे शब्द संपले ती मेणका हीच का? असला प्रश्नच मला पडला. माझ्या त्या आश्‍चर्यांकित मुद्रेकडे पाहत मेणका म्हणाली.
"पृथ्वी वरुन आलेला तुच तो बालक का?"
बालक!!मला ही म्हतारडी चक्क बालक म्हणतेय.असेल ती स्वर्गाची अप्सरा पण मला बालक म्हण्याचा अर्थ काय?.मला तसा त्या मेणकेचा फ़ार राग येत होता. पण मी काहीच करु शकत नव्हतो.फ़क्त मान हलवत मी तिला होकार दिला.त्यानंतर
पृथ्वी वरचे हालचाल मला मेणकेने विचारले.मीही त्याचे ठिकठाक उत्तर दिले.तस कोणाला माहित आहे पृथ्वीचे काय हाल.आहे जो तो आपआपला स्वार्थ बघतो.पण ती मेणका म्हतारी कशी?
कदाचित बरीच युग गेलीत.त्यात वय झाल असेल ह्या मेणकेच. मी स्वत:चीच समजुत काढत होतो.आम्ही मेणकेची भेट घेऊन पुन्हा परत येऊ लागलो.मनात तोच प्रश्न पुन्हा?शेवटी मी बंडुला प्रश्न विचारलाच.बंडु त्यावर म्हणाला "आजच्या २५ वर्षापहिले मेणकेने अखिल स्वर्गीय नृत्य संमेलनात काही कारणामुळे एका महान अशा साधुबाबाचा अपमान केला.त्यानीच मेणकेला म्हतारपणाचा शाप दिला."
"पण कुठवर हा शाप असाच रहिल त्याचा काही उशाप पण असेल ना?"
"हो आहे ना!!!! पण एकदम अशक्य वाटणारा"
"कोणता?"
"पृथ्वी वरच्या १०० पुण्यवान माणसांनी येऊन स्वच्छ आणि पवित्र गंगेच पाणी छिडकल्यावर मेणका शाप मुक्त होइल असा उशाप आहे"
"मग फ़ार कठिण आहे.कदाचित अशक्यही.कारण पृथ्वीवर पुण्यवान माणस शोधण्याचा प्रयत्‍न करण्याचा विचारही कोणी करु शकत नाही .आणि गंगेच स्वच्छ , पवित्र पाणी मिळवण्याचा प्रयत्‍न करण म्हणजे केवळ मुर्खपणा आहे"
या माझ्या वक्तव्यावर बंडु फ़क्त मेणकॆकडे उदास होऊन बघत होता.मग आम्ही पुन्हा दरबाराकडे जाण्यास निघालो.

क्रमश:

Thursday, 18 September 2008

वडापाव --प्रफ़ुल्ल

BE ची डिग्री हाती पडली पण नोकरी कुठे मिळेना
हजार अर्ज कंपनीला लिहली पण उत्तर काही येइना.

शेवटी जीव माझा वैतागला
काम करण्यास धडपडला
ओलांडून एक नाला
दिसला वडापावाचा ठेला

नोकरी इथ मिळवण्यासाठी अर्ज मी केला.
मुलाखत पुढच्या आठवड्यात आहे
म्हणुन सुटकेचा निश्‍वास टाकला

माझ्यासह आठजण मुलाखतीला आले
प्लेटधुन्यापासुन वडापाव विकण्यापर्यंतचे
सर्व प्रश्‍न त्यांनी मला विचारले
त्या सर्व प्रश्‍नाची मी समाधानकारक उत्तर दिले.

इतर मुलांपेक्षामाझीच उत्तर चांगली ठरली
म्हणुन ’जय मोगँम्बो बाबा वडापाव सेंटर’ मध्ये
नोकरी मला मिळाली.
उपासमारीमुळे नोकरीची सुरुवात दुसर्‍यादिवसापासुनच मी केली

काहीका होइना डिग्री च्या कागदाचा एकच उपयोग झाला
वडापाव च्या गाडीवर फ़्रेम करुन लटकवला.

(आता....... )
भरदुपारी वडापावाची गाडी मी लोटतो
’वडापाव लेलो’ ’वडापाव लेलो’ पण त्याबरोबर
जोरजोराने ओरडतो

वडापावावर मी अवलंबी झालोय
संध्याकाळी शंभरची नोट खिशात घालतोय
आणि पोटाची भुक पण वडापावानेच
शांत करतोय.
वडापावच आता माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक
झालाय
म्हनूनच माझ्या झोपडीच नाव मी ’वडापाव कुटी’
ठेवलय.

सुरुवातीला मला वडापाव विकण्याची लाज वाटत होती
पण काय करणार बेरोजगाराची झळ सर्वांनाच लागली होती
त्यामुळेचतर माझे बरेच वर्गमित्र बाजारात भाजीपाला
विकत होती.