Wednesday, 29 December 2010

एक रविवार मराठी चित्रपट

             आज रविवार आहे.तसा कुठला प्लान नाही.मित्राणा एखादी सिनेमा पाहुया म्हणून संगितल. एक मराठी सिनेमा  पाहुया म्हणून बोललो.तोच माझ्यावर हास्याचे तुषार उडवले गेले. मराठी सिनेमा पाहु अश्या वक्तव्या मुळे विविध टोलेबाजी सुरू झाली.
    "मराठी पिक्चर पाहायला जाउया, तुझ डोक तर ठीक आहे ना!" पहिला मित्रा
    "खराब डोक असलेल्या लोकासाठी मराठी पिक्चर काढतात"दुसरा मित्रा
    "मला तिथे जाउन झोपायच नाहीए"
    "असले भकास पिक्चर पाहण्याची माझी इच्छा नाही"
    "नाहीतर किती गर्दी असते मराठी चित्रपटाना"
    "ज्या प्रेमी युगूलना एकांत हवा असतो अशी जोडपी मराठी चित्रपट पाहण्यासाठी जातात आणि तिथे गेल्यावर ते एकमेकनाच पाहता"
            मराठी चित्रपटाचा  इतका  अपमान !!!.ते जास्त वेळ ऐकण  अशक्य झाल. मी तिथून ताडकन निघालो. आणि मी एकटा का असेना पण आज मराठी चित्रपट पाहणार असा निर्धार केला.आणि तस त्याना बोलावून पण दाखवल.तयारी केली आणि जाण्यास निघालो.तोच शेवटी मध्ये एक मित्र बोलण्यासाठी तडमडला.  
     " तू पुन्हा विचार कर, तुझा मेहनतीने कमावलेला पैसा वाया जाईल"
    "  मागच्या आठवड्यात पाहिलेला हॉलीवुड पिक्चर ने माझे किती पैसे वसूल झाले ते काही वेगळे सांगण्याची गरज नाही . हॉलीवुड पिक्चर पाहण्याचा प्लान तुझाच होता ना!!!"मी त्याला म्हणालो
    " अरे पण एखादी पिक्चर निघतो तसा पण मराठी पिक्चर बघने म्हणजे स्वताच्या कानफटित  दोन मारुन घ्याव्या असच   वाटते"
    "तुला वाटत असेल मला नाही. मी जाणार आहे एकटा .आपण  मराठी पिक्चर नाही बघायचा तर काय परग्रहा वरुन Alien नाही येणार इथे"
              तसाच तडकाफडकी शहरात निघालो.काल रिलीज झालेला एक मराठी चित्रपटाची तिकिट घेत होतो. शो तसा सुरू  व्हायला अर्धा तास बाकी होता.तोच माझी मित्र इथे येताना दिसली मला वाटल की चला याचे मत बदलले असावे आणि आज ते पहिल्यादा का होईना मराठी पिक्चर पाहतील असे वाटले.पण तसे नव्हते ते पुन्हा आज ही मराठी इतर पिक्चर पाहन्यासाठी आले होते.मल्टिपलेक्स मध्ये त्याच वेळेचा एक हिंदी पिक्चर लागला होता.सर्व गर्दी कदाचित तोच पाहण्यासाठी आली असावी कारण तिकिट काढताना फक्त फारच थोड़े मराठीचे तिकिट विकले गेले आहेत असे दिसून आले .बाकि सर्व इतर शो पहायला आले होते.त्यात माझे मित्र पण होते .मग तिकिट घेऊन मी thetre मध्ये गेलो. अजुन शो सुरू व्हयायचा होता.  हळू हळू लोक पण येऊ लागली.गर्दी तशी खूप नव्हती. पण मी जशी अपेक्षा केली त्या पेक्षा जास्तच होती. पिक्चर संपला. फार छान होता.(म्हनायच म्हणून म्हणत नाही खरच छान होता ) म्हणजे ज्या पाद्धतीने मराठी चित्रपटाची थट्टा उडवली  जाते.त्याच्या साठी हा चित्रपट म्हणजे एक योग्य उत्तरच असेल.
             मी बाहेर आलो.काही वेळानंतर माझे मित्र ही बाहेर आलेत. त्याच्या चेहरया वरचे भाव पाहून हे तर समजून आले की पिक्चर कसा असेल.मी  एक अवक्षर ही पिक्चर बद्दल काढले नाही.तसाच गप्पा राहिलो.     आणि ना राहुनच मी त्याना बोललो." आपण इतर चित्रपट  स्रुष्टिचे किती सारे चित्रपट बघतो. काही सुपर हिट ठरतात .तर काही ठीक राहतात.तर बरेच टाईमपास असतात.पण कधीतरी मराठी चित्रपटना आपण संधी दिली आहे?. बघण्यासाठी. "त्या नंतर मी ही गप्प होतो आणि ते ही.
             पण मनात तोच विचार होता.कधी बदलणार हे चित्र मराठी चित्रपटच. कुठ पर्यंत सरकारच्या मदतीमुळे मराठी चित्रपट श्वास घेत राहतील. म्हणतात की मराठी चित्रपटाचा सुवर्ण काळ सुरू झालाय कदाचित असेलही. पण केवळ राजकीय दबावामुळे,सरकार कडून सवलती मिळव्या म्हणून मल्टिपलेक्स चित्रपट दाखवतात. मराठी चित्रपटमध्ये  अत्याधूनीकता आली आहे!. मान्य आहे. पण ती इतर स्पर्धा करणार्‍या चित्रपटाइतकी नाही.याला कोण कारणीभूत असाव?. मराठी बजेट कमी असतात कारण जास्त लोक मराठी चित्रपट पाहु ईच्छित नाही की मराठी लोकामध्ये चांगले चित्रपट देण्याची गुणवत्ता नाही म्हणून?.असे मला वाटत नाही आपण एक चांगले मराठी चे चित्रा उभे करू शकतो. पण त्याकडे आपण कधी विचार करत नाही.केवळ वर्षभरात बोटावर मोजावे इतके चित्रपट रिलीज झाल्याचे समजतात.आणि केवळ एक किवा दुसरा चित्रपट हिट ठरतो.म्हणजे एक वर्षात निदान 150 मराठी चित्रपट बनतात.पण केवळ एक किवा दोनाचा चित्रपट हिट ठरतात आणि आम्हाला वाटते की मराठी चित्रपट स्रुष्टिटीचा सुवर्ण काळ आलाय.त्यापेक्षा असा बोलण बरोबर आहे,"नाही पेक्षा बर आहे".या सर्वला कारणीभूत कधी कधी आपणच असतो. इतके चित्रपट आपण बघतो पण कधी एकतरी मराठी चित्रपट theatre मध्ये जाउन बघतो काय? .
             मराठी जिवंत  राहते ती लोकामध्ये,विकसित होते ती साहित्यात . आता हे 21 शतक म्हणून चित्रपटामध्ये, टीवी    मध्यमामध्ये आपल्या भाषेला जीवंत ठेवणे गरजेचे आहे. अपेक्षा करतो की आपण या गोष्टीवर  विचार कराल.नाहीतर आपल्या पुढच्या पिढीला आपण हेच सांगणार.
    "Once upon a time there were a great language used to speak called as marathi,but as time passes it get vanish!!. its film!!its literature!! its words!!. everything get lost now marathi become history !!!!"
                       अशी वेळ कधीही येऊ नये हीच प्रार्थना.

No comments:

Post a Comment