शरीरातली चेतना क्षीण झालेली होती. ऑफीस मधून रूम कडे परतत होतो. मी व माझे मित्र बरोबर चाललो होतो.त्याचे चेहरे थकलेले होते.आणि माझ्या चेहरया वरचेही भाव काही वेगळे नव्हते. त्रान नसलेलेया माझ्या एका मित्राने हॉटेलात जाउन जेवण करूया असा आग्रह केला.तसा मी रोजच्या मेस चा डब्बा खाउन कंटाळलेलो होतो.आणि इतराना विरोध करण्याची इच्छा नव्हती म्हणून हॉटेलात जाउन जेवण करण्याचा ठराव बिना बोलतच पास झाला.
आम्ही हॉटेलात जेवलो. जाता जाता मला त्या होटेलात एक काचेची पेटी दिसली त्यात स्वच्छ पाणी होते आणि रंगीबेरंगी असे मासे पोहत होते.अशा सुंदर मास्याना पाहून काही वेळ का असे ना नयनसुख लाभत होते नाहीतर दिवसभर कंप्यूटर समोर बसून तीच 17 इंची कृत्रिम स्क्रीन बघने नशिबी!.दिवसे न दिवस असल्या कंप्यूटर स्क्रीन च्या किरणाची दृष्टीपटलाला सवय झाली. त्यामुळे असले सौंदर्य पहाणे कदाचीतच!. मी एकटक त्या मास्याकडे बघत होतो.जेवण झाल्यानंतर ही माझे त्याबद्दलचे विचार चालूच होते. ते मासे तसे सुंदर होते. असले सौंदर्य कुणाला क्वचितच भेटावे.पण विचार केला तर त्याचे तेच सौंदर्य त्याचेच शत्रू झालेत म्हणून तर ते काचेच्या पेटीत बंदिस्त होते.त्याचे स्वांत्र्य ते काय?.बस मालकाने टाकलेल्या खाद्या वर आयुष्यभर जगायचे आणि हॉटेलात येनारया जाणारया चे मनोरंजन करायचे!! याशिवाय त्याचे आयुष्या ते काय? त्या मास्याना माहीत आहे का की या पेटी च्या बाहेर ही एक जग आहे ?.नाहीच माहित असणार. त्याना ते पेटीतले स्वच्छ वातावरण आणि मालकाकडून मिळणारे जेवण हेच सर्वास वाटत असावे. काय उपहास हा जीवनाचा!.
कदाचित त्या मास्याचे जीवन बर्याच जणाच्या वाटेला येते.लहानपणापासून शिक्षण घेत आपण उच्च पदवी मिळवतो.वाट्टेल ती मेहनत घेतो आणि मुलाखती ला आपण किती हुशार आहोत असे भासवून आपण नोकरी मिळवतो. नोकरी मिळवल्यावर आयुष्यात सगळे काही मिळवले असेच वाटते .म्हणजे शिक्षणाचा उपयोग आपण एका company ची गुलामी मिळवण्यासाठीच करत नाही का?. मास्याच्या आयुष्यात त्याचे सौंदर्य त्याचे शत्रू ठरले तर आमच्या आयुष्यात आमचे शिक्षण!!.आणि पुढे नोकरी मिळाल्यावर ती टिकावी म्हणून वाट्टेल ती लाचारी पत्करतो.कदाचित परीस्थिति चे गुलाम बनतो. दाही दिशाचे समर्थ्या असणार्या या आपल्या जीवाचे उर्वरित आयुष्या अप्रेज़ल मिळण्यासाठी लागणार्या प्रयत्नातच जाते.माझे पॅकेज वाढावे बस हाच आमच्या नोकरीतील बाणा बनतो.आणि त्या मास्या प्रमाणे आम्ही लोक AC च्या वातावरणाला आणि महिन्याला मिळणारया पगाराला भूलुन उर्वरित आयुष्या चार भिंतीच्या पेटीतच काढतो.दर महिन्याला पगार मिळन्यासाठी वाट पाहतो.त्यासाठी डेडलाइन वर पूर्ण केलेले काम Manager ला दाखवून त्यांची स्तुती मिळवायचा खोटा प्रयत्न करत असतो. हा पण तर एक आपल्या जीवनाचा मोठा उपहास नाही का?.
मी ही एका AC रूम मध्ये बसून काम(?) करतो.चार भिंती मधले श्वास चार भिंतीतच राहतात.आयुष्यभर नोकरी करणार नाही हे तर निश्चित !.पण हे नोकरीमय चक्रव्युव तोडायाचे कसे हाच प्रश्न मनात असतो.याचे उत्तर मिळावे म्हणून मी पुन्हा त्या मास्याच्या अवस्था बद्दल विचार करतो.त्या मास्याना काय हवाय ?.त्या पेटीतून बाहेर पडायचाय?.बाहेर जातील तर जीवनाची स्पर्धा. मोठे मासे ही असतील त्याची शिकार करणारे.स्वतच्या रोजी रोटी चाही प्रश्न आहेच की!!!.त्याना काय हवाय सेफ वातावरण,हमखास मिळणारे रोजचे जेवण की स्वातंत्र्य!!!. आणि त्याच्याच आयुष्याशी साम्य असलेल्या मला काय हवाय?.
आता कंपनीत ही Reception जवळ एक काचेची पेटी आणली आहे. त्यात पण सुंदर मासे आहेत रोज जाताना येताना मला ते दिसतात. रोज त्याच प्रश्नाचा कल्लोळ मनात चालतो. त्या मास्याच्या आयुष्यात आणि माझ्या आयुष्यात काय फरक?.मला काय हवय? हमखास मिळणारा पगार की स्वातंत्र्य!!!!!!रोज दिसणारी ती पेटी अजुन ही मला घायाळ करते.
No comments:
Post a Comment