Monday, 20 December 2010

मी व मासे

        शरीरातली चेतना क्षीण झालेली होती. ऑफीस मधून रूम कडे परतत होतो. मी व माझे मित्र बरोबर चाललो होतो.त्याचे चेहरे थकलेले होते.आणि माझ्या चेहरया वरचेही भाव काही वेगळे नव्हते. त्रान नसलेलेया माझ्या एका मित्राने हॉटेलात जाउन जेवण करूया असा आग्रह केला.तसा मी रोजच्या मेस चा डब्बा खाउन कंटाळलेलो होतो.आणि इतराना विरोध करण्याची इच्छा नव्हती म्हणून हॉटेलात जाउन जेवण करण्याचा ठराव बिना बोलतच पास झाला.
       आम्ही हॉटेलात जेवलो. जाता जाता मला त्या होटेलात एक काचेची पेटी दिसली त्यात स्वच्छ पाणी होते आणि रंगीबेरंगी असे मासे पोहत होते.अशा सुंदर  मास्याना  पाहून काही वेळ का असे ना नयनसुख लाभत होते नाहीतर दिवसभर कंप्यूटर समोर बसून तीच 17 इंची कृत्रिम स्क्रीन बघने नशिबी!.दिवसे न दिवस असल्या कंप्यूटर स्क्रीन च्या किरणाची दृष्टीपटलाला सवय झाली. त्यामुळे असले सौंदर्य पहाणे कदाचीतच!. मी एकटक त्या मास्याकडे  बघत होतो.जेवण झाल्यानंतर ही माझे त्याबद्दलचे विचार  चालूच होते. ते मासे तसे सुंदर होते. असले सौंदर्य कुणाला क्वचितच भेटावे.पण विचार केला तर त्याचे तेच सौंदर्य त्याचेच  शत्रू झालेत म्हणून तर ते काचेच्या पेटीत बंदिस्त होते.त्याचे स्वांत्र्य ते काय?.बस मालकाने टाकलेल्या खाद्या  वर आयुष्यभर जगायचे आणि हॉटेलात येनारया जाणारया  चे  मनोरंजन करायचे!! याशिवाय त्याचे आयुष्या ते काय? त्या मास्याना  माहीत आहे का की या पेटी च्या बाहेर ही एक जग आहे ?.नाहीच माहित असणार. त्याना ते पेटीतले स्वच्छ वातावरण आणि मालकाकडून मिळणारे जेवण हेच सर्वास वाटत असावे. काय उपहास हा जीवनाचा!.
                 कदाचित त्या मास्याचे जीवन बर्‍याच जणाच्या वाटेला येते.लहानपणापासून शिक्षण घेत आपण उच्च पदवी मिळवतो.वाट्टेल ती मेहनत घेतो आणि मुलाखती ला आपण किती हुशार आहोत असे भासवून आपण नोकरी मिळवतो. नोकरी मिळवल्यावर आयुष्यात सगळे काही मिळवले असेच वाटते .म्हणजे शिक्षणाचा  उपयोग आपण एका company ची गुलामी मिळवण्यासाठीच करत नाही का?. मास्याच्या आयुष्यात त्याचे सौंदर्य त्याचे शत्रू ठरले तर आमच्या आयुष्यात आमचे शिक्षण!!.आणि पुढे नोकरी मिळाल्यावर ती टिकावी म्हणून वाट्टेल ती लाचारी  पत्करतो.कदाचित परीस्थिति चे  गुलाम बनतो. दाही दिशाचे समर्थ्या असणार्‍या या आपल्या जीवाचे उर्वरित आयुष्या अप्रेज़ल मिळण्यासाठी लागणार्‍या प्रयत्नातच जाते.माझे पॅकेज वाढावे बस हाच आमच्या नोकरीतील बाणा बनतो.आणि त्या मास्या प्रमाणे आम्ही लोक AC च्या वातावरणाला  आणि महिन्याला मिळणारया पगाराला भूलुन उर्वरित आयुष्या चार भिंतीच्या पेटीतच काढतो.दर महिन्याला पगार मिळन्यासाठी वाट पाहतो.त्यासाठी डेडलाइन वर पूर्ण केलेले काम Manager ला दाखवून त्यांची स्तुती मिळवायचा खोटा प्रयत्न करत असतो. हा पण तर एक आपल्या जीवनाचा मोठा उपहास नाही का?.
              मी ही एका AC रूम मध्ये बसून काम(?) करतो.चार भिंती मधले श्वास चार भिंतीतच राहतात.आयुष्यभर नोकरी करणार नाही हे तर निश्चित !.पण हे नोकरीमय चक्रव्युव तोडायाचे कसे हाच प्रश्न मनात असतो.याचे उत्तर मिळावे म्हणून मी पुन्हा त्या मास्याच्या  अवस्था बद्दल विचार करतो.त्या मास्याना काय हवाय ?.त्या पेटीतून बाहेर पडायचाय?.बाहेर जातील तर जीवनाची स्पर्धा. मोठे मासे ही असतील त्याची शिकार करणारे.स्वतच्या रोजी रोटी चाही प्रश्न आहेच की!!!.त्याना काय हवाय सेफ वातावरण,हमखास मिळणारे रोजचे जेवण की स्वातंत्र्य!!!. आणि त्याच्याच आयुष्याशी साम्य असलेल्या मला काय हवाय?.
            आता कंपनीत  ही Reception जवळ एक काचेची पेटी आणली आहे. त्यात पण सुंदर मासे आहेत रोज जाताना येताना मला ते दिसतात. रोज त्याच प्रश्नाचा कल्लोळ मनात चालतो. त्या मास्याच्या आयुष्यात आणि माझ्या आयुष्यात काय फरक?.मला काय हवय? हमखास मिळणारा पगार की स्वातंत्र्य!!!!!!रोज दिसणारी ती पेटी अजुन ही मला घायाळ करते. 

Tuesday, 14 December 2010

घडलो  मी  असा   काही  
जीवनात  सारे  ओघळत जाई 
पूर्ण विराम आणखी  गावत  नाही
वाट माझी  मी चालत  जाई

Wednesday, 3 November 2010

एक पाखरू मला दिसते.

एक पाखरू मला दिसते.
पाहून मला हुळूच हसते
जेव्हा काही बोलायचे असते
पाठ फिरून का बर फिरते


या गोष्टीवर विचार करतो
पुन्हा पुन्हा मी गर गर करतो
यावर मन माझे लिहित जाते
कागदावर शब्द उमटत जाते
एक पाखरू मला दिसते.



प्रेम पत्र मी तिला दिले
वाच म्हणून हे सांगतले
हुळूच तिने पत्र उघडले
नयन तिचे ते पाहू लागले
पाहून पत्र का ती हसते
त्यावर ती काय म्हणते
एक पाखरू मला दिसते.



ती म्हणाली :
“मुझे मराठी समज नही आती
क्या लिखा ये पढ नही पाती
में मराठी बोलणे से डरती हु
एसिलये तुझे देख के में भागाती हु
गलत न समज ये मेरे दोस्त
सिर्फ हिंदी हि में समजती हु "

त्यानंतर मी हिंदी शिकत राहिलो
कठोर परिश्रम घेत राहिलो
आणि मी हिंदी पंडित झालो
आता पत्र मन तिला लिहिते
एक पाखरू मला दिसते.


एक दिवस तिचे उत्तर आले
“क्या बकवास तू हिंदी लिखता हे
क्या बकवास तू हिंदी बोलता हे
न कर बोर ये दिल केहता हे

मेरे शादी का ये कार्ड हे
आना चाहता हे तो 
 चुपचाप बैठके आना हे”


हे सारे  आमच्या आयुष्यात घडते
असे झाले म्हणून खाचायचे नसते
खंबीर मानाने उभे राहायचे असते
आणि पाखरू दुसरे शोधायचे असते

Monday, 4 October 2010

मराठी चित्रपटाची वाट

नुसते मराठी चित्रपटाचे दर कमी करून  मराठी  चित्र  पुढे  धावणार  नाही .मराठी पाऊल जर पुढे टाकायचे असेल तर  त्यासाठी  प्रथमता  मराठी  चित्रपटाना तितके मजबूत  व्हावे  लागेल. आजच्या  market मध्ये  टिकण्यासाठी  ते  गरजेचे  आहे . नाहीतर कोणताही प्रेक्षक चित्रपट  पाहण्यास धजावणार नाही.

Tuesday, 10 March 2009

माझी स्वर्गाची यात्रा (भाग-५)


       किरपांध्रविषेश बाजार म्हणजे या बाजारात सर्व देवगण आणि सर्व अग्रस्थ अवस्थेतील मानव,पुंजर्क या दिवशी एकत्र एका वातावरणात येतात.हा बाजार फ़क्त काही महत्वाचे निर्णय घेवयाचे असतील त्याच वेळेस भरतो.बाजार संपण्याच्या वेळेस दरबारात काही महत्वाचे ठराव पास होतात.मागच्या वेळेस पुंजर्काना स्वर्गाच्या देखरेख विभागात दाखल करण्यात आले होते.आणि स्वर्ग आणि नर्क कामगार संघटना (Associations of workers of swarg and nark) स्थापण करण्यात आली होती.बर्‍याच दिवसापासुन मला पुंजर्का बद्द्ल प्रश्न पडला होता.पण त्याचा अर्थ आज या ’स्वर्ग-नर्क इतिहास’ या पुस्तकात माहित पडला.पुंजर्काचे वंशज हे पुराणातील दानव आहेत हे मला यातून कळाले.म्हणुनच तर बंडु मला पुंजर्का बद्द्ल माहिती सांगण्यास कचरत होता.  
          दानव आणि देव यातील शेवटच्या युध्दात देवांचा विजय झाला.त्यात दानवाचा पराभव झाला.सर्व दानवांना मारण्यात आले.कारण हे दानव भंयकर,क्रुर होते.पण त्यातले काही योध्ये दानव म्रृत्युलोकात पळून गेले.पण मारल्या गेलेल्या काही दानवाचीच लहान मुल होती.काही तर नवजात शिशु होती.हि बालक निष्पाप होती म्हनून त्यांना जिवनदान देण्यात आले.निष्पापच्या कारणामुळे त्याना स्वर्गात जागा मिळाली.आणि पुढे जावुन त्यांना पुंजर्क म्हणुन संबोधन मिळाले.या युध्दात फ़क्त काहीच देव सहभागी होते.कारण कलयुग सुरु होताच जवळ जवळ सर्वच देवता समाधीत गेली.दर कलयुगात फ़क्त काही कोटी देवता समाधीत जातात पण या कलयुगात इतके देव समाधीत का गेलीत?.याच कारण मात्र मला समजु शकल नाही.या सर्व गोष्टीमुळे मी अवाकच झालो होतो.
 शेवटच्या युध्दात मारल्या गेलेल्या दानवांना नर्कात जागा दिली गेली.कृत्रीम शरीर देवुन त्याना अग्रस्थ अवस्थेत टाकले गेले.त्याचे पाप इतके होते की त्यादिवसापासुन आज पर्यत त्यांना नर्क यातना दिल्या जात आहे.अग्रस्थ अवस्था काय असते याच्या बद्द्ल मला फ़ुंकणीरावानी थोडेफ़ार मला सांगीतले होते पण त्यावेळेस मला इतके विषेश वाटले नव्हते.माणुस मरतो तेव्हा त्याच्या कर्मानी स्वर्ग किंवा नर्क गाठतो पण तो मेल्यावर त्याचे शरिर मेल्यावर. फ़क्त त्याचा आत्माच या स्वर्गात किंवा नर्कात प्रवेश करतो. स्वर्ग म्हणजे सुखाची जागा आणि नर्क म्हणजे दु:ख. स्वर्ग म्हणजे वाटेल त्या सुखसुविधा आणि नर्क म्हणजे दिर्घकाळ यातना.पण आत्म्याला कसले आले सुख आणि दु:ख .त्याला कितीही यातना दिल्या किंवा सुख सुविधा दिल्या तरी आत्म्याला काय फ़रक पडणार म्हनून यावर तोडगा ब्रह्मदेवांनी शोधला.की त्यांना द्‍वारापाशीच कृत्रीम शरिर देण्यात यावे.सर्व मृतांना स्वर्ग-नर्कावर आल्यावर शरिर दिले जाते.आणि त्याच्या कर्मानुसार त्यांना फ़ळ दिले जाते.आणि विषेश म्हणजे त्याना मागच्या जन्माचे काहीच आठवत नाही. पण ही तर फ़क्त अग्रस्थ अवस्था का टाकले जाते.याचे स्पष्टीकरण होते.पण अग्रस्थ अवस्था नेमकी काय असते ते मला काही माहीत नव्हते.ते कदाचित आज किरपांध्रविषेश बाजारात अग्रस्थ अवस्थे बद्द्ल माहित पडण्याची शक्यता होती.कारण आज अग्रस्थ अवस्थेतील मानव बाजारात येणार होती.
 
    ओम चलाकिरपांध्रविषेशबाजार नम:. क्षणार्धात मी बाजाराच्या वातावरणात आलो.आता या वेगवेगळ्या वातावरण पहाण्याची मला सवय झाली होती. पण या बाजारात काही विकायला किंवा विकत घ्यायला दिसत नव्हते.नाहीतर बाजार म्हटल तर असलेच चित्र डोळ्यासमोर उभे रहाते पण हे चित्र भरपुर वेगळे होते.


क्रमश: