Thursday, 31 July 2008

प्रियसीचा कुत्रा
-प्रफ़ुल्ल

प्रियसीचा कुत्रा हा मी आल्यावरच भुंकतो
वाटत असते तिला भेटायचे पण
कुत्रा मध्ये तडमडतो

मारली होती लाथ त्याच्या कंबरड्यात
भुंकुन त्याने मलाच पाडले डबक्यात

आता त्याच्यावर दया नाही
दे‌‌ईल त्याला सजा कारण
त्याने प्रेमाची घातली माझी मजा

आज संध्याकाळी घे‌ईल त्याला पट्यात
घे‌ईल त्याचा जीव एका झटक्यात

जेव्हा माझी योजना प्रियसीला समजली
गालात माझ्या एक देऊन तडकन निघुन गेली

प्रेमभंग झाला कशामुळे ??????
एका कुत्र्यामुळे

ही लज्जास्पद घटना माझ्या आयुष्यात घडली
‌इथुन पुढे एक सवय मला जडली

कुत्रा नसेल जिच्या दारी
तिच्यावरच प्रेम करेल भारी.

1 comment:

  1. पप्या Hat's Off आपला सलाम तुझ्या कल्पनेच्या भरारीला. अजुन लिहीत रहा ... नवीन हास्यकवी जन्माला आला.

    ReplyDelete