Wednesday 30 July, 2008

प्रेमाचा संन्याशी -- प्रफ़ुल्ल

प्रेमाचा कोणतातरी मार्ग तुम्ही दाखवा
आतातरी तुमच्या भक्ताची व्यथा दुर करा
(असे एकुन )
साधुबाबा उठले आणि म्हनाले

"प्रेमाचा सुगंध आहे जो तुझ्या मनात
निघेल तो एका क्षणात,उत्तर तुझे
मिळेल एका स्मशानात"

सुटबुट घालुन गेलो मी स्मशानात
अंधाराची काळी रात्र होती आभाळात

घाबरत घाबरत पाऊले माझी पडली
‌‌इतक्यात कडाडून विज आभाळत चमकली
चिली मिली गिली म्हनत एक चेटकीन पुढे आली
घडली व्यथा तिला सांगितली पण झाले उलटेच
ती चेटकीनच माझ्या गळे पडली

प्रेमकर माझ्यावर मीच तुझी राणी
वाक्य तिचे ऎकताच आली मला ग्लाणी
हे बघ चेटकीनी असली जरी तु कानीबानी
तरी भेटेल तुला दुसरा कुणी
वाट सोड माझी तु नाही ग माझी राणी

हे बोल माझे ऎकता संताप तिला आला
फ़रफ़टत फ़रफ़टत नेऊन तिने मला एका
कबरीवरती सोडला
‌इतक्यात एक पाटी कबरीवरती दिसली
वाक्य ती वाचायला सुरवात मी केली

" प्रेमाचा शोध घेणार्‍या येड्‍यानो
येऊ नका या मार्गी काहीकेलेतरी
स्मशानच लागेल तुमच्या नशिबी "

वाचुन हे सारे अर्धमेला मी झालो
धावत पळ्त पुन्हा साधुबाबा कडे गेलो
(आणि मग काय?)
त्यांच्या बाजुला चटई टाकुन मी पण
साधुबाबा झालो.

3 comments:

  1. बापरे तुम्ही सन्याशी ज़ाला तर मुलीन्च कस होइल?
    पण खुपच छान कविता आहे ह!

    ReplyDelete
  2. oye pappu, kahi sadhubaba vagaire nako banus tu, saral saral lagna karun tak!!!!

    ReplyDelete