Wednesday, 16 May 2012

आंबा नको मागूस

गुलाब हे प्रेमाचे प्रतिक आहे त्याप्रमाणे तो तिच्यासाठी गुलाबाची भेट  घेऊन गेला.
ती म्हणालीः "गुलाब राहु दे ,पण तुझ्या दुसर्‍या हाथातल्या पिशवीत आंबा दिसतोय तो देशील"
तोः "हे प्रिये तु म्हणालीस तर आणखी गुलाबाचे दोन-चार गुच्छ आणतो वाटल्यास आकाशातील चंद्र तारे तोडुन आणतो पण आंबा नको मागू"
तीः" पण मला तो आंबाच हवा आहे,तुझ ना! माझ्यावर प्रेमच नाही"
तोः"प्रेम वैगरे ठीक आहे पण आंबा मिळणार नाही"

तो तिथुन बाहेर पडला  फक्त आंबा घेऊन.        
बघितलं मित्रांनो आंबा किती दुर्मिळ आणि महाग गोष्ट झाली आहे.

Monday, 2 April 2012

भुंगा


सुंदर ती कळी वेडी, साज तिला ज्वानीचा
उमलताच एक दिवस अन भुंगा प्रेमात पडाला
व्यक्त नाही झाले भितीपोटी, बस बघत तो राहिला
नजरेच्या ह्या खेळात, तो वेडा अनिक वेडा झाला


खुडली एक दिवस कुनी देवास वाहण्याला
नाही फुल त्याचे ,प्रेम सांगण्याला जेव्हा आला
ती निर्माल्यात केव्हाच वाहुनी गेली होती नदित
पण आयुष्यभर तिला शोधत राहिला हा बिचारा 

Thursday, 8 March 2012

काही मिळाले काही निसटले


तांरागने ती स्वप्नाची आकाशी कशी पसरलेली.
रोज रोज खुनवती ,बोलती तरी ती निजलेली.
मनात गुंफुनी भोल्या आशा, एक निसटला तारका.
दुख त्याची होत असता, इच्छा पुरी करुनी गेला.

Tuesday, 3 January 2012

डबकं आणि नदी

"तुला एवढ मोठ लफड करायला कुणी सांगितल होत,आपण छोटेसे डबके ,त्या नदीला लाईन मारशील तर महागात पडेल"
"माझ त्या नदीवर प्रेम आहे"
त्या खळाळत जाणार्‍या नदीच्या तो प्रेमात पडला होता,आणि त्याचा मित्र त्याला समजवण्याचा निरर्थक प्रयत्न करत होता,प्रेमात पडल म्हणजे मित्राचे बोलणे म्हणजे फालतु सल्ले वाटतात.त्याने नदीला आपले प्रेम व्यक्त केले,नदीचा तोरा काही औरच होता "माझ्या सारख्या नदीची  सुंदरता आणि तुझ्यासारख्या घाणेरड्या डबक्याची काही तुलना होऊ शकते का? तुझ्या भावना तुझ्या सारख्या साचलेल्याच राहु दे"
तो बिचारा काहिच बोलला नाही ,नदी तोर्‍यात निघुन गेली,
डबकं रडायला लागला त्या डबक्याचा मित्र" आता रडवुन तु स्वतालाच आटवतो आहेस,खरच तुझ त्या नदीवर प्रेम असेल तर घडव स्वताला अथांग , तिला सामावुन घेशील इतका मोठा हो,मग येईल ती तुझ्या ओढीने"
मित्राचे सल्ले जरी पहिले फालतु वाटत असले तरी तेच नंतर आधार देतात.ते डबकं तिथुन निघुन गेलं ,न बोलता न रडता, पण आतल्या आत ते अश्रु गिळत होतं,अचाट प्रयत्नानंतर तो अथांग झाला ,अफाट झाला, चोहोबाजुनी विस्तारला, .जी लोक त्याची अवहेलना करीत होती तिच आता त्याला 'समुद्र' म्हणु लागली.प्रेमाच्या धुंदीने त्या डबक्यात तरंग निर्माण होऊन त्याच्या लाटा होऊ लागल्या,तर गिळलेल्या अश्रुनीच त्याला खारट बनवल.
नदी त्या डबक्याच हे अफाट रुप पाहुन पुरती घायाळ झाली.तिचा अहंकार एका क्षणात विसरली.त्या समुद्र बनलेल्या डबक्याचे ओढीने धाऊ लागली.तो इतका खारट असुनही ती काहीही न बोलता त्या समुद्राशी एकरुप झाली.

ते डबकं इतर डबक्यासारखाच होता ,पण प्रेम नावाच्या गोष्टीने त्याला इतकं अथांग बनवल"