उगाचच कुणाच्यातरी आठवणीत भिजायचय
तासनतास अभ्यास बुडवून कुणाचा तरी विचार करायचाय
आपण लास्ट तर तिने फर्स्ट यायचे आहे
प्रेम म्हणजे फुकटचा लोचा आहे
जिच्यासाठी अविरत झुरायच तिने शांतपणे बघायचय
आम्ही इकडे कासावीस तिने मात्र आरामात रहायचय
दिसली समोर की धडधडने याने वाढवायचे आहे
तिने मात्र अलगद नजर वळवून पुढे जायाचे आहे
प्रेम म्हणजे फुकटचा लोचा आहे
सार्या मित्रांशी वैर करुन तिच्या मागे फिरायचय
बाहेर पडताना चार वेळेस आरशात बघायचय
तिच्या एका थॅंक्यु शब्दासांठी कॅन्टीन मध्ये पाकीट खाली करायचे आहे
प्रेम म्हणजे फुकटचा लोचा आहे
कधीतरी हिंम्मत एकटवुन सांगायचय
प्रेमपत्र ,गुलाब लाल बरोबर द्यायचय
मनातल्या भावना समोर बोलुन मोकळ व्यायचय
"आपण चांगले मित्र होऊ" अस म्हणुन तिने मान वळवायची आहे
आपण मात्र तिच्या पाठमोर्या आकृतीकडे बघताना
तिने कुणा दुसर्याच्या हाथात हाथ द्यायचे आहेत
प्रेम म्हणेज ,प्रेम म्हणेज!!! च्यायला फुकट फालतुचा लोचा आहे
No comments:
Post a Comment