तसं तर काही ठरलं नव्हतं पण जे झाल ते खूप छान होत.कालचा दिवस अविस्मरणीय ठरला.आम्ही सार्या मित्रांणी जेवण केले.हॉटेलातून बाहेर पडलो तर बिग सिनेमाच्या थेटर कडे लक्ष गेल.कुणाच्या मनात आल काय माहीत!.पण एक सिनेमा बघुया असा ठराव संमत झाला.पहिले मी व माझा मित्रा जाऊन शो ची चौकशी करण्यास गेलो.मल्टिपलेक्स त्यात रात्रीचा शो म्हणजे 200-250 च चंदन लागणार हे निश्चित म्हणून काही मित्रांच मत सिनेमा न पाहण्यच होत. कुणी घरी जाण्याला उशीर होईल.उद्या ऑफिसला लवकर जायचे अशी कारणे देऊ लागलीत.आम्ही चौकशी करून आलो .प्रत्येक शो चा रेट हा 100 रुपये आहे अस कळालं. जशा सरकारी फाइल मंत्रालयातून गहाळ होतात तसेच सर्वाची कारणे मनातून गहाळ झालीत.जो तो आपल्या परीने स्वःताची कारणे सावरू लागला आणि उद्याच आपण मॅनेज करून घेऊ अस सांगू लागलेत.शो 9:20 चा होता.पण आम्हाला थोडा उशीर झाला होता त्यामुळे तो शो पहाणे मुश्कील होते.नंतरचा शो 11 वाजता होता.
शो 11 चा म्हणजे घरी जात जात रात्रीचे 2 होणार.अरे बापरे!!!. काहीच जणांकडे बाइक असल्याकारणाने घरी परत जाण्याचा प्रॉब्लेम.जो तो आपल्या डोक्याचे चक्र फिरवू लागला.आपण असं करू आपण तसं करू अशा प्रकारची कुजबुज चालू लागली.सिनेमा कुठल्याही परिस्थीत पाहण्याचा एवढा निश्चित होत.आता काही झाल तरीही सिनेमा बघायचाच असा ठरलं पण....
पण ....असं होत की आमच्या बरोबर जेवणाला 3-4 मुली पण होत्या.ते ही सिनेमा पाहण्याचा हट्ट करु लागलेत .ज्यांना त्यांना रात्री घरी पोहचवायचे म्हणजे डोक्याला मोठा ताप.म्हणून काय तर आमचं आज पिक्चर पहाणे रद्द होणार होते.मग जो तो हताशपणे निघायला लागला.तोच एक भन्नाट कल्पना एका मित्राच्या मनात आली.सर्व मूलीना गुमाने जाऊ दिले.आम्ही ही घरी चाललो असा अभिनय केला.मुली गेल्यानंतर आम्ही पुन्हा थेटर जवळ आलो.11 वाजे चा शो बघितला.सिनेमा एवढा खास नव्हता पण इतका सारा आटापिटा केल्यानंतर तो सिनेमा चांगला वाटला.
आम्ही एकूण 9 जण होतो आणि बाइक ३ होत्या. एका एका बाइक वर 3 जण रूम कडे निघालो .आम्हा सर्वाना एकाच रूम ला थांबायाचे असे ठरले.रात्रीचे 2 वाजले होते.उद्या सकाळी ऑफीस ला जायचे होते.डोळ्यात झोप मावत नव्हती.हाइवे ने सुसाट निघालो.तोच एका पोलिसाने अडवले.गाडी बाजूला घेण्यास सांगितली.एका गाडी वर तीन कसे अशी विचारणा करू लागले .गाडी ची कागदपत्रे वैगरे विचारू लागले. डोळ्यात आलेली सारी झोप उडाली.आता काय होणार या चिंतेत आम्ही पडलो.खटला भरू दंड करू अशा प्रकारची बोली बच्चण ते करू लागले.पहिल्यादा एका इमानदार पोलिसाचा आम्हाला राग आला होता.तोच एक रिक्षा तिथे आली त्यात सहा लोक बसले होते.रिक्षा ओवरलोड केली त्यामुळे पोलिसांनी अडवली होती.त्या रिक्षावाल्याने आपली ओळख इथल्या नगरसेवकाशी असल्याचे सांगितले.पोलिसाने काडीचा प्रश्न न विचारता त्याला जाऊ दिले.आम्ही हे सारे बघत होतो .जवळ जवळ अर्धा तास आम्ही तिघे थांबलो होतो.बाकीच्या दोन बाइक च्या मित्रांनी वेळीच प्रसंगावधान दाखवले व पटापट गाडीवरुन उड्या मारल्या होत्या फक्त आमचीच गाडी पोलिसांनी अडवली होती .मला वाटलं 100-200 रुपये देऊन सुटका होईल पण बराच वेळ आम्ही आळस देत उभे होतो. थोडा वेळ गेल्यावर पोलिसाने आम्हाला जाऊ दिले.किती मानधन द्यावे लागले विचारू नका.रूम वर पोहचता पोहचता 3 वाजले होते.रूम वर येताच जो तो जागा पकडून 4-5 तासासाठी झोपेत गेला.एक गोष्ट पक्की आजच्या दिवसाची संपूर्ण कथा त्या सिनेमा पेक्षा ही चांगली होती. इतके मी ठाम म्हणू शकतो.पण आमच्या गोष्टी चा क्लाइमॅक्स बाकी आहे.कारण त्या मूलींना माहीत नाही की आम्ही त्यांना लपवून सिनेमा बघितला.
No comments:
Post a Comment