कळून गेले सारे तरी बोलली नाही काही
वर्षे लोटली किती , पण परिस्थिती बदलली नाही
आम्ही वेडे खुळे ,मागे लागलो का ग
तुच सांग आता, आम्ही मूर्ख का ग
लाज का वाटते आहे,प्रीत सांगण्याची
भीती का वाटते आहे,हृदय मागण्याची
तुला सांगण्याची ,भीती वाटते का ग
दे मला ग्वाही, पाहु वाट का ग
बंध का तोडत नाहीस ,मी वाट पाहत आहे
कधी येशील मिठीत , स्वप्न मी सजवित आहे.
नाही बोलत माझ्याशी,घायाळ झालीस का ग
चिंब झालिस तू, अश्रुत न्हालीस का ग
वेळेचे ही बंधन तुजला , पाळायाचे आहे
कुठ पर्यंत वाट पाहु ,मरण्याचे श्वास आहे
वाट पाहण्याची ,कास धरतेस का ग
प्रेम पडताळण्याची , परीक्षा घेतेस का ग
Thursday, 6 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
khupach chhan.......!
ReplyDeletemanala bhawanari
ReplyDeleteabol prit khup kahi boltey............
ReplyDelete