स्वर्ग आणि नर्क या कल्पनेने मला एकदा फ़ार पछाडले.मग या गोष्टीचा छडा लावायचा मी ठरवल.गोष्ट तशी सोपी नव्हती पण प्रयत्न केल्यावर काय नाही होत.
म्हनुन गावोगाव फ़िरलो बरेच आश्रम छानले.बर्याच साधुबाबाना भेटलो. तेव्हा मला भेटले ह.भ.प. लुंगीवर चूंगी बाबा.खरे तर ते साधुबाबा कमी आणि scientist जास्त होते.म्हनुन तर त्यानी वेगवेगळ्या प्रकारची मशिन बनविले होती.
ते स्वर्ग व नर्कातील"Associations of workers of swarg and nark" यातील एका कर्मचार्याशी गुप्तपणे संधान साधुन होते हे मला गुप्तपणे समजले.मी त्याच्याकडे स्वर्गात जाण्यासाठी आग्रह धरला पण ते एकेनाच पण मी ही माझी लांबण सुरुच ठेवली.सरते शेवटी लूंगीबाबा त्याचा शिष्य मुन्नाभाई राजु जलेला जो एके काळचा underworld don होता त्याला म्हनाले ."जर मी याला स्वर्गात नाही पाठवले तर याच्यामुळे मी नक्कीच स्वर्गात जाईन."
त्या मुन्नाभाईला पण या बाबानीच नर्क दाखविला होता म्हनुन तर त्याने underworld ची लाईन सोडली होती.
पण काही का असेना मला या शुक्रवारी स्वर्गात जाण्याची संधी मिळणार होती.शुक्रवारी स्वर्गाचा तर शनिवारी नर्काचा बाजार भरत असे.
२.
चला आज मी स्वर्गात जाणार ते पण जिवंत.
मोबाईल वैगरे charging करुन घेतला होता. फ़ोटो आणि कँमरा पण घेतला होता.
आता फ़क्त जेवणाची व्यवस्था करायची राहीली होती कुणास ठाऊक तिथे खायला मिळते की नाही.
या विचारत असतानाच एक आवाज आला " ओ ओ .... हा फ़ोर्म भरा" मुन्नाभाई माझ्याकडे ओरडत म्हाणाला.
मी फ़ोर्म भरायला सुरुवात केली.
१) नाव,पत्ता,जात,फ़ोन नं न सांगता खालील माहीती भरा.
२} तुमच्या मागे पुढे कोणी असेल तर त्याची जबाबदारी आमची नाही
३)खालील अवयवांची वजन लिहा.
१. मेंदु : ______
२.ऋदय : ______
३.मन : ______
मी हा पर्याय पाहताच आश्चर्याने मुन्नाभाईकडे पाहुन म्हणालो
"काय हो मी दोन वर्षा पासुन माझ्या पूर्ण शरिराच वजन नाही केल आणि तुम्ही चक्क मला
वेगवेगळ्या अवयवाच वजन करायला सांगतात आणि त्यात मनाचही वजन करायला
सांगताय. तुम्ही कधी मेंदु,ऋदय,मन याच वजन केलय का? काही तरी काय सांगताय"
मुन्नाभाई आग्रहाने बोलला "वजन तर करावेच लागेल"
"मग द्या तराजु काटा आताच मोजतो" मी रागाने बोलायला लागलो.अस वाटायला लागल की हे मला
बनवताय.
"अहो तुम्हाला काही तराजु काट्यात वजन नाही करायच एक छ्मटम नावाच मशिन आहे त्यात करायचय" मुन्नाभाई म्हणाला.
"हे शक्य आहे?पण याची गरज काय?" माझा प्रश्न.
"हो नक्कीच शक्य आहे.आणि तुमचे फ़क्त इतकेच अवयव स्वर्गात जातील.बाकी कृत्रीम शरीर तिथे गेल्यावर दिले जाईल. त्यासाठी या गोष्टीच वजन घेणे गरजेचे आहे..आणि बाकी प्रश्नाची उत्तर तिथेच मिळतील समजल का? " मुन्नाभाई अस बोलुन निघुन गेला.
पण त्याने सांगितलेल्या गोष्टी वर कसा विश्वास ठेवायचा?मी बराच वेळ विचार करत होतो माझ मन माझ्या शरिरात कुठे आहे हे मला माहीत नाही हे तर त्याच वजन करायला जाताय.कस काय शक्य आहे?.पण या प्रश्नाच उत्तारासाठी मला जास्त वेळ बसाव लागल नाही. मी एका गोलाकरात मशिनी मध्ये गेलो मध्ये काय झाले मला माहीत नाही पण मी सहीसलामत होतो एवढेच!!!.त्यात मनाच वजन होत : ०.०९८३X10^ -890 kg..
३.
त्यानंतर मला एका गोलाकार त्रीकोनी मशिन मध्ये नेण्यात आले. आणि पुढे अंधकार..............................................
क्रमश:
Friday, 8 August 2008
Sunday, 3 August 2008
माझ्या व्याख्या
विद्यार्थी :- अभ्यासाशिवाय सगळ्या गोष्टी मध्ये रस असणारा जीव
अभ्यास:- परिक्षा पास होण्यासाठी केला जाणारा आटापिटा
मन :- अशी गोष्ट ज्याची व्याख्या करता येणे कठीण आहे.
(ही पण एक व्याख्या झाली हाss हाss हाss ...)
कॉलेज:- लेक्चर सक्ती चे असतील तर एक कैदखाना.
नाहीतर..............(काही अनुभव नाही म्हणून काही सांगता
येणार नाही)
अभ्यास:- परिक्षा पास होण्यासाठी केला जाणारा आटापिटा
मन :- अशी गोष्ट ज्याची व्याख्या करता येणे कठीण आहे.
(ही पण एक व्याख्या झाली हाss हाss हाss ...)
कॉलेज:- लेक्चर सक्ती चे असतील तर एक कैदखाना.
नाहीतर..............(काही अनुभव नाही म्हणून काही सांगता
येणार नाही)
आत्महत्या
--प्रफ़ुल्ल
प्रेमभंग झाला कारण खिशात दमडी नव्हती
या घटने मुळेच आत्महत्या ची कल्पना मला सुचली
गळफ़ास घेउ की नदीत जीव देऊ
विष घेऊन मरु की जळुन मरु
एका पाठोपाठ सर्व प्रयत्न केले
याच प्रयत्नात माझे हसे झाले
गळफ़ास घेताना दोर हा तुटला
हात फ़ँक्चर होऊन गळ्यात माझ्या पडला
नदीत द्यायला गेलो जीव तेव्हा पाणी कमी होते
म्हणुनच उडी मारल्यावर डोके माझे फ़ुटले
विष नाही भेटले म्हनुन कोकाकोला पेप्सी मी पिले
मरण नाही आले पण जुलाब सुरु झाले
(त्याच्यामुळेच दोन दिवस माझे हाल झाले)
रॉकेल आणण्यापहिले तुडवडा याचा पडला
जळन्याबरोबर मरण्याचाही प्रयत्न मी सोडला.
कारण मला समजल की प्रेमात जीव का देता
ते तर खर्या अर्थी कंटाळुन आत्मह्त्या करता.
प्रेमभंग झाला कारण खिशात दमडी नव्हती
या घटने मुळेच आत्महत्या ची कल्पना मला सुचली
गळफ़ास घेउ की नदीत जीव देऊ
विष घेऊन मरु की जळुन मरु
एका पाठोपाठ सर्व प्रयत्न केले
याच प्रयत्नात माझे हसे झाले
गळफ़ास घेताना दोर हा तुटला
हात फ़ँक्चर होऊन गळ्यात माझ्या पडला
नदीत द्यायला गेलो जीव तेव्हा पाणी कमी होते
म्हणुनच उडी मारल्यावर डोके माझे फ़ुटले
विष नाही भेटले म्हनुन कोकाकोला पेप्सी मी पिले
मरण नाही आले पण जुलाब सुरु झाले
(त्याच्यामुळेच दोन दिवस माझे हाल झाले)
रॉकेल आणण्यापहिले तुडवडा याचा पडला
जळन्याबरोबर मरण्याचाही प्रयत्न मी सोडला.
कारण मला समजल की प्रेमात जीव का देता
ते तर खर्या अर्थी कंटाळुन आत्मह्त्या करता.
Subscribe to:
Posts (Atom)