Tuesday, 4 January 2011

शोधीत होतो वाट जीवना

शोधीत  होतो वाट जीवना, अंधार डोळी दाटला
नाही मिळाला अर्थ जीवना, राग उदरी साठला

नाही अपेक्षा कसली, श्वास तो घेत होतो
का कळेना आस जीवाची ,आमरण जळत होतो

फूल बनूणी समोर आली, तीच माझी वहिवाट झाली
चालन्यास गेलो तेव्हा काट्याची बरसात झाली

बघत होतो चेहरे सारे ,दर्पण पाहणे राहीले
गीत जे झाले मनी ,तेच एकणे राहीले

Monday, 3 January 2011

हवालदिल बंडू काका

      
        बंडू काका नेहमी बोलायचे की मला एक सुंदर घर बांधायचे आहे.आणि खूप वर्षाची इच्छा ती या वर्षी पूर्ण झाली.बंडू काकांनी     फार सुंदर घर बांधले.एक पिक्चर ची शूटिंग यात करता येईल आणि एखादी हेरॉईन घराला बघून म्हणेल  " अय्या इतके सुंदर घर मी माझ्या आयुष्यात पहिले नाही "(या अलंकारा ला अतिशयोक्ती अलंकार म्हणतात).बंडू काकांनी  घरात हव्या तितक्या सुख सुविधा  करवून घेतल्या.एखाद्या फिल्मी स्टाइल सारखा टाइगर नावाचा डोबरमँन कुत्रा पण पळून घेतला. या कुत्र्याचा आणखी एक उपयोग बंडू काका करतात तो म्हणजे नको असलेल्या पाहुन्याना घाबरवण्यासाठी!.
     सर्व गोष्टि नीटनेटक्या केल्या आहेत.बंडू काकांनी  किचन फार मोठा घेतला आहे.सुरुवातीला किचन फार रिकामा वाटायचा.खूप सारे भांडे असतानाही रूम च्या साइज़ मुळे तो रिकामा वाटायचा. बंडू काकांना ते सहन झाले नाही. किचन पूर्ण भरलेले वाटत नाही तोपर्यंत भांडे विकत घेऊन ते किचन मध्ये रचून ठेवले.ज्या वेळेस मी या किचन चा अवतार पहिल्यादा पहिला त्यावेळेस मला वाटले की बंडू काकांनी भांड्याच दुकान सुरू केला की काय!.लोक म्हैस घेतली म्हणून बादली विकत घेतात.पण इथे गोष्ट उलटी आहे बादली घेतली म्हणून म्हैस विकत घेतल्याचा प्रकार आहे.
      आज मी सहजच बंडू काका  कडे गेलो.काका चा चेहरा उदास होता. मी कारण खूप वेळा विचारण्याचा प्रयत्न केला.पण काही केल तरी ते मला सांगत नव्हते.शेवटी मी काकूना विचारले तेव्हा मला सविस्तर माहिती मिळाली.
     दगडू पाटील शेजारी राहायला आले.शेजारच्याची विचारपूस करावी म्हणून घरी आले  होते.एवढे सुंदर घर पाहून ते पण भारावून गेले .त्यानी दारावरची बेल वाजवली.काका नि दरवाजा उघडला.   
      काका  उवाच " कोण आपण "
      दगडू पाटील उवाच " मी इथे शेजारी नवीन राहायला आलो.मला इथल्या मालकणा भेटायचाय"
      काका उवाच "हो मीच या घरचा मालक"
       दगडू पाटील " अहो इथल्या खऱ्या खुर्‍या मालकाला भेटायचाय"
      काका त्याना केविलवण्या पद्धतीने समजाऊ लागले पण दगडू पाटील समजण्याच्या  तयारीतच  नव्हते.हा वाद विवाद काकू नि एकला आणि त्या धावत पळत तिथे आल्या. आणि हेच या घरचे मालक आणि मी याची बायको अशी ओळख करवून दिली.नशीब काकुचा तरी त्यानी ऐकलं.
    दगडू पाटील उवाच "माफ करा हं मी तुम्हाला समजण्यात चुक केली. इतक्या मोठ्या घरचे  मालक असे  असतील  अस नव्हत वाटल ."
     त्या एकाच वाक्याचा जो काय काय अर्थ निघाला असेल ते मलाही मांडता येण शक्य नाही.घटना तशी मोठी नाही पण बंडू काकांनी तो आपला अपमान वाटला.म्हणून तर काय ते आज उदास होते.आणि न राहवून  बंडू काका बोलून गेले."सभवतालच्या गोष्टिना सुंदर बनवता बनवता मी त्याबरोबर स्वताला  बदलवण्याच राहून गेलो.घर तर सुंदर बांधले पण त्या घरात राहण्याच्या लायकी चा मी नाही राहिलो."   
    आज एक शिकावण मिळाली.आपणच बदलणारया ,घडवणारया  गोष्टीना देखील स्वताचे अनुकुलन हवेच असते.

Thursday, 30 December 2010

जात होतू रातले शेतवरना बांध ले(एक अहिराणी कविता)

जात होतू रातले शेतवरना  बांध  ले
रस्ता मा भेटना गडी मना संगतले
वेशी ना बाहेर जाताच रोडवर बसाले
पण काय करू  डबडा  मा पाणी
 नव्हत दोनिसले पुराले

आते काय करानं  समजं नही माले
तदलोंग उना मित्रा आठेच बठाले
झाय काम,सुटनात डुक्करं खावाले
मित्रा ने पाणी दिन गडी ले धुवाले 
गाव मा जाताच लोक का हसी राहीले
जात होतू रातले शेतवरना  बांध  ले

दोनिसना चडया  काळ्या कशा काय व्हायनात
वंगण मा चडया त्यासन्या  भरण्यात 
डब्बा मा वंगण होतं तवय समजं  माले
ज्यानी डब्बा मा वंगण भरलं , मरी माय खाय जो त्याले
जात होतू रातले शेतवरना  बांध  ले

[आते दोनी  म्हणतस]
तू वाची गया, आमनाशी  खे झाया
चडया त फेकी दीन्यात  पण 
ढुंगनं  काया व्हयी  गयात
रातले नाही आते जातस
डब्बा मा काय ते चेक करी लेतस

असा व्हयनं  त्यासनासंगे सांगी  राहीनू तुमले
खबरदारी ल्या तुम्ही पुन्हा सांगी राहीनू तुमले
जात होतू रातले शेतवरना  बांध  ले

Wednesday, 29 December 2010

एक रविवार मराठी चित्रपट

             आज रविवार आहे.तसा कुठला प्लान नाही.मित्राणा एखादी सिनेमा पाहुया म्हणून संगितल. एक मराठी सिनेमा  पाहुया म्हणून बोललो.तोच माझ्यावर हास्याचे तुषार उडवले गेले. मराठी सिनेमा पाहु अश्या वक्तव्या मुळे विविध टोलेबाजी सुरू झाली.
    "मराठी पिक्चर पाहायला जाउया, तुझ डोक तर ठीक आहे ना!" पहिला मित्रा
    "खराब डोक असलेल्या लोकासाठी मराठी पिक्चर काढतात"दुसरा मित्रा
    "मला तिथे जाउन झोपायच नाहीए"
    "असले भकास पिक्चर पाहण्याची माझी इच्छा नाही"
    "नाहीतर किती गर्दी असते मराठी चित्रपटाना"
    "ज्या प्रेमी युगूलना एकांत हवा असतो अशी जोडपी मराठी चित्रपट पाहण्यासाठी जातात आणि तिथे गेल्यावर ते एकमेकनाच पाहता"
            मराठी चित्रपटाचा  इतका  अपमान !!!.ते जास्त वेळ ऐकण  अशक्य झाल. मी तिथून ताडकन निघालो. आणि मी एकटा का असेना पण आज मराठी चित्रपट पाहणार असा निर्धार केला.आणि तस त्याना बोलावून पण दाखवल.तयारी केली आणि जाण्यास निघालो.तोच शेवटी मध्ये एक मित्र बोलण्यासाठी तडमडला.  
     " तू पुन्हा विचार कर, तुझा मेहनतीने कमावलेला पैसा वाया जाईल"
    "  मागच्या आठवड्यात पाहिलेला हॉलीवुड पिक्चर ने माझे किती पैसे वसूल झाले ते काही वेगळे सांगण्याची गरज नाही . हॉलीवुड पिक्चर पाहण्याचा प्लान तुझाच होता ना!!!"मी त्याला म्हणालो
    " अरे पण एखादी पिक्चर निघतो तसा पण मराठी पिक्चर बघने म्हणजे स्वताच्या कानफटित  दोन मारुन घ्याव्या असच   वाटते"
    "तुला वाटत असेल मला नाही. मी जाणार आहे एकटा .आपण  मराठी पिक्चर नाही बघायचा तर काय परग्रहा वरुन Alien नाही येणार इथे"
              तसाच तडकाफडकी शहरात निघालो.काल रिलीज झालेला एक मराठी चित्रपटाची तिकिट घेत होतो. शो तसा सुरू  व्हायला अर्धा तास बाकी होता.तोच माझी मित्र इथे येताना दिसली मला वाटल की चला याचे मत बदलले असावे आणि आज ते पहिल्यादा का होईना मराठी पिक्चर पाहतील असे वाटले.पण तसे नव्हते ते पुन्हा आज ही मराठी इतर पिक्चर पाहन्यासाठी आले होते.मल्टिपलेक्स मध्ये त्याच वेळेचा एक हिंदी पिक्चर लागला होता.सर्व गर्दी कदाचित तोच पाहण्यासाठी आली असावी कारण तिकिट काढताना फक्त फारच थोड़े मराठीचे तिकिट विकले गेले आहेत असे दिसून आले .बाकि सर्व इतर शो पहायला आले होते.त्यात माझे मित्र पण होते .मग तिकिट घेऊन मी thetre मध्ये गेलो. अजुन शो सुरू व्हयायचा होता.  हळू हळू लोक पण येऊ लागली.गर्दी तशी खूप नव्हती. पण मी जशी अपेक्षा केली त्या पेक्षा जास्तच होती. पिक्चर संपला. फार छान होता.(म्हनायच म्हणून म्हणत नाही खरच छान होता ) म्हणजे ज्या पाद्धतीने मराठी चित्रपटाची थट्टा उडवली  जाते.त्याच्या साठी हा चित्रपट म्हणजे एक योग्य उत्तरच असेल.
             मी बाहेर आलो.काही वेळानंतर माझे मित्र ही बाहेर आलेत. त्याच्या चेहरया वरचे भाव पाहून हे तर समजून आले की पिक्चर कसा असेल.मी  एक अवक्षर ही पिक्चर बद्दल काढले नाही.तसाच गप्पा राहिलो.     आणि ना राहुनच मी त्याना बोललो." आपण इतर चित्रपट  स्रुष्टिचे किती सारे चित्रपट बघतो. काही सुपर हिट ठरतात .तर काही ठीक राहतात.तर बरेच टाईमपास असतात.पण कधीतरी मराठी चित्रपटना आपण संधी दिली आहे?. बघण्यासाठी. "त्या नंतर मी ही गप्प होतो आणि ते ही.
             पण मनात तोच विचार होता.कधी बदलणार हे चित्र मराठी चित्रपटच. कुठ पर्यंत सरकारच्या मदतीमुळे मराठी चित्रपट श्वास घेत राहतील. म्हणतात की मराठी चित्रपटाचा सुवर्ण काळ सुरू झालाय कदाचित असेलही. पण केवळ राजकीय दबावामुळे,सरकार कडून सवलती मिळव्या म्हणून मल्टिपलेक्स चित्रपट दाखवतात. मराठी चित्रपटमध्ये  अत्याधूनीकता आली आहे!. मान्य आहे. पण ती इतर स्पर्धा करणार्‍या चित्रपटाइतकी नाही.याला कोण कारणीभूत असाव?. मराठी बजेट कमी असतात कारण जास्त लोक मराठी चित्रपट पाहु ईच्छित नाही की मराठी लोकामध्ये चांगले चित्रपट देण्याची गुणवत्ता नाही म्हणून?.असे मला वाटत नाही आपण एक चांगले मराठी चे चित्रा उभे करू शकतो. पण त्याकडे आपण कधी विचार करत नाही.केवळ वर्षभरात बोटावर मोजावे इतके चित्रपट रिलीज झाल्याचे समजतात.आणि केवळ एक किवा दुसरा चित्रपट हिट ठरतो.म्हणजे एक वर्षात निदान 150 मराठी चित्रपट बनतात.पण केवळ एक किवा दोनाचा चित्रपट हिट ठरतात आणि आम्हाला वाटते की मराठी चित्रपट स्रुष्टिटीचा सुवर्ण काळ आलाय.त्यापेक्षा असा बोलण बरोबर आहे,"नाही पेक्षा बर आहे".या सर्वला कारणीभूत कधी कधी आपणच असतो. इतके चित्रपट आपण बघतो पण कधी एकतरी मराठी चित्रपट theatre मध्ये जाउन बघतो काय? .
             मराठी जिवंत  राहते ती लोकामध्ये,विकसित होते ती साहित्यात . आता हे 21 शतक म्हणून चित्रपटामध्ये, टीवी    मध्यमामध्ये आपल्या भाषेला जीवंत ठेवणे गरजेचे आहे. अपेक्षा करतो की आपण या गोष्टीवर  विचार कराल.नाहीतर आपल्या पुढच्या पिढीला आपण हेच सांगणार.
    "Once upon a time there were a great language used to speak called as marathi,but as time passes it get vanish!!. its film!!its literature!! its words!!. everything get lost now marathi become history !!!!"
                       अशी वेळ कधीही येऊ नये हीच प्रार्थना.

Wednesday, 22 December 2010

एका रिकामटेकड्या(bencher) माणसाची आत्मकथा


           नमस्कार मंडळीनो,हा लेख तुम्ही वाचायला घेतला त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार.(कारण रिकामटेकड्या माणसाचे दुख आणखी कोण समजून घेणार!!). तसा मी एका कंपनीत लागलोय. चांगला पगार पण मिळतो. पण गंमत अशी आहे की एक महिना झाला तरी मला इथे काडीचे काम नाही . या AC वातावरणात साधी माशी पण नाही निदान त्याना मारण्याच काम तरी मी केला असत. मी सध्या प्रॉजेक्ट च्या शोधात आहे.त्यामुळे मला वरच्या लोकानी वेटिंग करायला लावली आहे. पण वेटिंग करता करता माझी वाट लागली आहे.दिवसभर मी नुसता कंप्यूटर समोर बसून टीवल्या बावल्या करत असतो(आणखी माझ्याकड़े  पर्याय तो काय).त्यामुळे एकडे तिकडे सारखी नजर मारीत असतो. कोण किती झोपतो,कोण किती काम करतो.कोण किती गप्पा मारता याची सर्व डीटेल माझ्याकडे आहे. जर सीनियर मॅनेजर ने मला संगितल की कोणाचा अप्रेज़ल करायाच आणि कुणाच नाही ते मी ठाम पानने सांगू शकतो.
          IT भाषेत माझ्या सारख्या लोकाना बेंचर म्हणतात.कुणी विचारल की तू कंपनीत काय करतो तर  त्याना सांगतो की मी बेंच वर बसलो आहे.(फिज़िकली नाही मेन्टल्ली म्हण्याचय!!!) माझ्या आजुबाजूला पण 3-4 बेंचर आहेत. त्याच्या पेक्षा मला जास्त बेंच वर बसण्याचा अनुभव  आहे. आम्ही सर्वानी मिळून एक कम्यूनिटी स्थापन केली आहे 'अखिल कंप्यूटर बेंचर कम्यूनिटी'.आणि प्रेसिडेण्ट मी आहे!. आमची प्रोग्रेस तशी फार चांगली आहे.आज पर्यंत मी ऑफीस मधील 3 प्रेम प्रकरणाचा सखोल अभ्यास केला आहे बाजूची मंजू त्या समोर  बसलेल्या प्रकाश च्या प्रेमात आहे. रोज ते निदान 30-40 लव-ईमेल एकामेकाना पाठवत असावे  असा सर्वे मी केलाय.आता पर्यंत मी 10 जनाना Youtube वर पिक्चर पाहाताना पकडलाय.आणि 5 जन कायम फसेबूक लावून बसलेले असतात.बॉस आला की प्रॉजेक्ट विंडो ओपन करतात. तसा कंपनी चा प्रोग्रेस रिपोर्ट बरा आहे.पण ऑफीस मध्ये फक्त काही काम करणार्‍या लोका मुळे कंपनी टिकून आहे असे वाटते. मी रिकामा असला तरी मी माझा वेळ वाया घालावत नाही इतर किती काम करतात हे निरीक्षण करून त्या वेळचा सदउपयोग करतो.
          मी एकदा मॅनेजर ला प्रॉजेक्ट मागण्यासाठी गेलो.आणि मला काम करायाच आहे म्हणून संगितल. मॅनेजर माझ्या कडे आश्चर्याने  बघू लागला.आणि म्हणाला "तू गंमत तर नाही ना करत आहे.माझ्या आयुष्यात फार कमी  Emplyee बघितले  की ज्याना काम करण्याची इच्छा आहे" मी थोडासा तिखट पाने हसलो आणि बोललो की "मला खरच काम हवाय बेंच वर बसून बसून कंटाळा आलाय"
         आता मला माझे मॅनेजर मला एक्सप्लेन करू लागले "आपल्या कंपनीत एकूण 700 Employee आहे काही काम स्व:तून करतात काहीजनाकडून करवून घ्यावे लागतात. आता कंपनीत आम्ही मुद्दामन काही बेंचर घेतले. ज्यामुळे बेंचर Employee सारखे एकडे तिकडे निरक्षण करत असतात.काही का असेना त्यामुळे काही Employee काम करतात.आता तुला एक महिना झाला तुला मी याच स्टेटस विचरणारच होतो. मला ईमेल करून सांग की प्रमाणिक पणे काम कोण करतो म्हणजे त्याचीच अप्रेज़ल मी करेल".काही वेळ मला समजेनाच  झाल की असाही बेंचर ठेवन्याचा  उद्देश असेल.पुढे मॅनेजर बोलू लागला " आम्ही कॅमेरे तसे खूप ठेवले पण खरे खुरे काम चुकार असले कॅमेरे शोधुन  काढत नाही. मग जीवंत कॅमरा म्हणजे तुम्ही बेंचर आम्ही त्याच्या आजूबाजूला ठेवतो.आणि अपेक्षा आहे की तू खरा खुरा सर्वे मला पाठावशील. त्यावर तुझा अप्रेज़ल डिपेंड आहे"मी तर हे एकूण गंगरून  गेलो.
      त्यनंतर, माझ्या मॅनेजर ला मी माझ्या महिन्या भरच्या संशोधनाचा रिपोर्ट पाठवला.तस त्यावर मला P.H .D करता आली असती.मॅनेजर ने माझी खूप स्तुती केली.आणि मला एका प्रॉजेक्ट वर पण असाइन केल. आज माझ्या हातात माझा अप्रेज़ल लेटर आहे.मी केलेल्या सखोल संशोधनाचा तो मोबदला आहे.मी आता कंपनीत काम करतो.आजबुजूला पण काही Employee  ही काम करतात.कारण आम्हाला माहीत आहे की आपल्या समोर एक बेंचर बसलेला आहे आणि त्याची ही नजर एकडे तिकडे फिरत असते.
      तुम्ही ब्लॉग जर कंपनीत वाचत असाल तर लगेच  बंद करा.कारण कोण जाणे कोणता बेंचर तुमच्यावर नजर ठेवून असेल?.